कोल्हापूर मध्ये नेहमीच्या प्रथे प्रमाणे प्रत्येक सणास मग ती दिवाळी असो, ईद असो, वा ख्रिसमस असो, प्रत्येक सणाला या खात्याची पाण्याची बोंबच आहे . आणि ही बोंब ऐकण्यासाठी कोणीही उच्च अधिकारी अथवा पाणीपुरवठा खात्याचा अधिकारी उपलब्ध नाहीत , नागरिकांतून संतप्त भावना व्यक्त करण्यात येत आहे..
आयुक्त मॅडम रजेवर आहेत…
आज सकाळपासून सरनोबत साहेब यांचा फोन बंद असून
ॲडिशनल कमिशन केशव जाधव यांचाही फोन बंद असल्याने
पाणीपुरवठ्याच्या रविराज यांचा व
दळवी मॅडम यांचा देखील फोन बंद असल्याने जनतेने जाब कोणाला विचारावा की तक्रार कुठे करावी असा संभ्रम कोल्हापूरकरांच्या मनात आता येत आहे
गणी आजरेकर बोलताना म्हणाले की,
दहा वाजता येणारे पाणी सवा एक वाजता आले तेही बारीक धारेचे व पावणे दोन वाजता ला गेले
अशी पाण्याची बोंबाबोंब झाल्यामुळे पाण्यासाठी महिला वर्ग या दिवाळी सणांमध्ये आक्रोश करीत आहेत
पाण्याच्या या परिस्थितीवर आज संध्याकाळपर्यंत तोडगा न निघाल्यास उपयुक्त जाधव यांचा कैबिन ला कुलुप लावुन संतप्त महिलांचा मोर्चा पाणीपुरवठा खात्यावर घेवून जाण्याच्या इशारा गणी आजरेकर यांनी दिला आहे.