SP9/ शिराळा प्रतापराव शिंदे
समाजभान जपनारे कर्तव्यदक्ष अधिकारी जिथे असतात तिथे समाजिक उन्नती घडण्यास वेळ लागत नाही. आज समाजात समाजभान जपनारे मोजकेच अधिकारी पहायला मिळतात त्यामध्ये उपवनसंरक्षक राहुल पाटील यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.
बिळाशी ता. शिराळा येथील आयएफएस अधिकारी राहुल पाटील यांनी अलिबागचे उपवनसंरक्षक म्हणून राहुल पाटील यांनी नुकताच पदभार स्विकारला आणि त्यांनी पहिल्यांदा रायगड जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी पाड्यातील कुटुंबांना वस्तीवर जाऊन त्यांचे हालाकीत चाललेले जीवन बघितले
आणि त्यांच्यातील माणुसकीला पाझर फुटला त्याच दिवशी आयएफएस अधिकारी राहुल पाटील यांनी मार्च अखेर १५० कुटुंबांना रोजगार उपक्रम उपलब्ध करून देण्यासाठी तयारी दर्शविली आहे.
तसेच याच दुर्गम भागातील पाड्यातील कुटुंबांची दिपावली इतरांच्या सारखीच गोड व्हावी या हेतूने आज स्वतः पुढाकार घेत येथील सुमारे तीस मुलांना नवीन कपडे व दिपावली फराळाचे वाटप केले.
यावेळी फराळ आणि कपडे वाटप करताना चिमुकल्यांचा आनंदाला पारावर उरला नव्हता. उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी केलेले सामाजिक कार्य निश्चितच अभिमानास्पद असेच आहे. आदिवासी पाड्यातील समाजातून राहुल पाटील या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचे कौतुक होत आहे.