Gooseberry or amla benefits : लिव्हर कॅन्सर झाल्यावर शरीर काम करणं बंद करतं. कॅन्सरची माहिती वेळेवर मिळाली तर ठीक नाही तर जीव जाण्याचा धोका अधिक असतो. कारण कॅन्सर लास्ट स्टेजवर गेल्यावर त्यावर उपचार करणं अवघड होतं.
अशात आवळा हे फळ लिव्हर कॅन्सरसोबत इतर कॅन्सर रोखण्यासाठी फार फायदेशीर ठरतं. यात व्हिटॅमिन सी भरपूर असतं. जे शरीरासाठी फार महत्वाचं आहे. आपल्या शरीराचा प्रत्येक भाग सेल्सपासून तयार झाला आहे.
ज्या स्वत:ला रिपेअर करत असतात. व्हिटॅमिन सी या कामात मदत करतं आणि रिकाम्या पोटी आवळा खाल्ल्याने वजनही कमी होतं. चला जाणून घेऊ थंडीच्या दिवसात रोज आवळा खाण्याचे फायदे.
लिव्हर कॅन्सरपासून बचाव
एका रिसर्चनुसार, आवळ्याचं सेवन केल्याने SW620 सेल्सची ग्रोथ रोखली जाऊ शकते. या सेल्स लिव्हर कॅन्सरसोबतच स्कीन कॅन्सरचं मुख्य कारण असतात.
ब्लड शुगर कंट्रोल
अनेक रिसर्चमध्ये आवळ्याला डायबिटीसच्या रूग्णांसाठी गुणकारी मानलं गेलं आहे. याने फास्टिंग आणि जेवणानंतर ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल ठेवण्यास मदत मिळते. टाइप 2 डायबिटीस मॅनेज करण्यासोबतच यापासून बचावही होऊ शकतो.
म्हातारपण रोखणारं फळ
वय वाढण्यासोबतच त्वचा आणि केसही खराब होऊ लागतात. नजर कमजोर झाल्याने लोकांना दिसण्यातही समस्या होऊ लागते. पण आवळा खाऊन तुम्ही या समस्या दूर करू शकता. आवळ्याने त्वचा, केस आणि डोळे चांगले राहतात.
हिवाळ्यात का खावे आवळे?
हिवाळ्यात इम्यून सिस्टम कमजोर होतं. अशात फ्लू आणि इन्फेक्शन होण्याचा धोका अधिक असतो. लहान मुले आणि वयोवृद्धांना आजारी पडण्याचा धोका जास्त असतो. अशात आवळ्यातील व्हिटॅमिन सी ने इम्यून सिस्टम मजबूत होतं.
रक्तातील चरबी होईल कमी
कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसरायड बॅड फॅट असतात. जे रक्तवाहिन्यांमध्ये जमा होतात. हार्ट अटॅक आणि स्ट्रोकसाठी हे दोन्ही जबाबदार असतात. आवळा खाल्ल्याने हे फॅट कमी होतं आणि हृदयरोगांचा धोका टळतो.