“माझी गोड परी आराध्या, तू माझ्या आयुष्यातील….”, ऐश्वर्याची लेकीसाठी हृदयस्पर्शी पोस्ट

0
117

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची लाडकी लेक आराध्या बच्चन 12 वर्षांची झाली आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक दोघांनीही आराध्यासाठी स्पेशल पोस्ट शेअर केली आहे. ऐश्वर्याने आराध्याला शुभेच्छा देताना एक अनसीन फोटो शेअर केला आहे.

ऐश्वर्याने आराध्यासोबतचा लहानपणीचा सुंदर फोटो शेअर केला आहे. तर अभिकेषकनेही लाडक्या लेकीसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे.

आराध्या बच्चन अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत असते. आराध्या ही देखील लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहे. ती नेहमीच तिची आई ऐश्वर्यासोबत दिसते. आराध्या ही एका प्रसिद्ध बॉलिवूड घराण्याची मुलगी आहे.

ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन ही बॉलिवूडमधील आवडत्या स्टार किड्सपैकी एक आहे. आराध्या 16 नोव्हेंबर रोजी 12 वर्षांची झाली.

ऐश्वर्या राय बच्चनने आपल्या इंस्टाग्रामवर आराध्याचा लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. याफोटोत चिमुकली आराध्या गुलाबी फ्रॉकमध्ये आईसोबत सेल्फी घेताना दिसते आहे.

हा फोटो शेअर करताना ऐश्वर्याने लिहिले, ‘मी तुझ्यावर आयुष्यभर निस्वार्थी प्रेम करत राहिन. माझी गोड परी आराध्या. तू माझ्या आयुष्यातील प्रेम आहेस. मी तुझ्यासाठी श्वास घेते… माझा आत्मा… आनंदी राहा. देव तुला सदैव आशीर्वाद देवो..’

अभिषेक बच्चनने मुलगी आराध्याचा बालपणीचा फोटो शेअर केला होता. फोटोत छोटी आराध्या तिच्या वडिलांकडे प्रेमाने पाहत आहे. फोटोसोबत त्याने लिहिले, ‘माझ्या छोट्या राजकुमारीला हॅपी बर्थडे! मी तुझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम करतो.” यूजर्सनीही आराध्यालाही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here