तमिळ सुपरस्टार सूर्या रुग्णालयात दाखल, ‘कंगुवा’ सिनेमाच्या शूटदरम्यान घडली भयानक दुर्घटना

0
119

तमिळ सुपरस्टार सूर्या (Suriya) आगामी सिनेमा ‘कंगुवा’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. शूटिंगदरम्यानच त्याचा अपघात झाल्याची माहिती आता समोर आली आहे. एक सीन करताना कॅमेराच त्याच्यावर पडल्याची दुर्घटना घडली.

यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर टीमने त्याला तातडीने रुग्णालयात हलवले.

अभिनेता सूर्या चेन्नईमध्ये ‘कंगुवा’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. दरम्यान एका सीनचं शूट सुरु असताना कॅमेराच त्याच्यावर पडला. सध्या तो रुग्णालयात उपचार घेत असून अद्याप अधिक माहिती समोर आलेली नाही.

सूर्याची तमिळ आणि तेलुगू इंडस्ट्रीत प्रचंड क्रेझ आहे. टॉलिवूडमध्ये त्याचं मोठं नाव आहे. त्याचा प्रत्येक सिनेमा तेलुगूमध्येही डब केला जातो. आगामी ‘कंगुवा’ सिनेमाचं दिग्दर्शन अॅक्शन डायरेक्टर म्हणून प्रसिद्ध असलेले शिवा करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here