चीनमध्ये झपाट्याने पसरतोय गूढ आजार, भारत सरकार सतर्क; दिल्या महत्वाच्या सूचना

0
68

चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुप्त आजार पसरत आहे. लहान मुलांना या आजाराची लागण होत आहे, आता जागतीक आरोग्य संघटनेने याबाबत सूचना दिल्या आहेत. तर दुसरीकडे देशातील आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली आहे.

श्वसनाच्या निमोनियाच्या आजाराने मोठ्या प्रमाणात लहान मुले बाधित होत आहेत. भारत सरकारही या आजारावर बारीक लक्ष ठेवून आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी एका निवेदनात म्हटले आहे की, भारत चीनमधील मुलांमध्ये निमोनियाच्या नोंदलेल्या प्रकरणांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहे. आतापर्यंतच्या मूल्यांकनानुसार भारताला धोका कमी आहे.

आरोग्य मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे की, “सध्याच्या परिस्थितीमुळे उद्भवलेल्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी भारत तयार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय चीनमधील मुलांमधील H9N2 उद्रेक आणि श्वसन आजाराच्या क्लस्टरवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

एव्हीयन इन्फ्लूएंझा प्रकरण तसेच चीनमधून नोंदवलेल्या श्वसन रोगांच्या क्लस्टर्सचा भारताला कमी धोका आहे. ”सध्या उपलब्ध माहितीच्या आधारे, चीनमध्ये श्वसन आजाराच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झालेली नाही. गेल्या काही आठवड्यात घटनांमध्ये वाढ नोंदवली आहे. मुलांमध्ये श्वसन रोगाची सामान्य कारणे ओळखली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, देशातील एव्हीयन इन्फ्लूएंझा प्रकरणांविरूद्धच्या तयारीच्या उपायांवर चर्चा करण्यासाठी आरोग्य मंत्रालयाच्या तांत्रिक शाखा, आरोग्य सेवा महासंचालनालयाच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक झाली.

ऑक्टोबर २०२३ मध्ये, चीनमध्ये H9N2 चे एक प्रकरण नोंदवले होते, याचा अहवाल WHO ला देण्यात आला होता. आरोग्य मंत्रालयाने उत्तर चीनमधील मुलांमध्ये श्वसन रोगाचा प्रादुर्भाव झाल्याच्या मीडिया अहवालांचीही नोंद घेतली. डब्ल्यूएचओनेही याबाबत निवेदन जारी केले आहे.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने म्हटले आहे की, त्यांनी मुलांमध्ये श्वसन रोग आणि न्यूमोनियाच्या संभाव्य चिंताजनक वाढीबद्दल माहिती देण्यासाठी चीनला अधिकृत विनंती केली आहे.

डब्ल्यूएचओने बुधवारी उशिरा दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हे प्रकरण श्वसन संक्रमणाच्या वाढीशी संबंधित आहेत की नाही हे स्पष्ट नाही. शास्त्रज्ञांनी सांगितले की परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करणे आवश्यक आहे, परंतु ते सहमत नाहीत की चीनमधील श्वसन रोगांच्या प्रकरणांमध्ये अलीकडील वाढ नवीन जागतिक उद्रेकाची सुरूवात दर्शवते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here