तुषार गांधी म्हणाले, मी इथं आल्यावर हा घडलेला प्रकार मला दाखवण्यात आला. भिडेमुळे मला आज दुःख झालं आहे. हा सायबर गुन्ह्याचा प्रकार आहे. भिडे आणि आयोजकांच्या विरोधात आम्ही तक्रार दाखल केली आहे. आतापर्यंत माझे पणजोबा महात्मा गांधींवर टीकाटिपणी होत असे. तेव्हा आम्ही ते एक सामाजिक चळवळीचे नेते असल्याने काही दखल घेतली नाही. परंतु या माणसाने माझ्या कुटुंबाच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले आहेत.
पुणे: शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे नेहमीच वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असतात. संभाजी भिडे यांनी आता महात्मा गांधी यांच्यासंदर्भात एक विधान केले आहे. यावरून आता वाद निर्माण झाला आहे.
या विधानाचे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवशेनात पडसाद उमटले. यावरून काँग्रेसच चांगलीच आक्रमक झाली होती. आता महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधींनी महाराष्ट्र सरकार अजूनही गप का? असा सवाल उपस्थित करत पुण्याच्या डेक्कन पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
पुरोगामी महाराष्ट्र राज्यात असं काही घडत असताना महाराष्ट्र सरकार गप का आहे. उपमुख्यमंत्री यांनी सांगितलं कि तपास करू, एक महिना होत आला तरी अजून काही दखल घेण्यात आली नाही. आमचा न्यायालयावर विश्वास आहे. म्हणून आम्ही न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार आहोत.
करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नाहीत. ते त्याच मुस्लीम जमीनदाराचे पुत्र असल्याचे वक्तव्य संभाजी भिडेंनी केलं. इतकेच नाही तर मोहनदास यांचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुस्लीम पालकाने केल्याचा दावा संभाजी भिडेंनी केला. या विधानानंतर काँग्रेस, पुरोगामी पक्ष संघटना, समाज चळवळीतील कार्यकर्ते आक्रमक भूमिका घेत संभाजी भिडेंना अटक करण्याची मागणी करत आहेत.