नाथपंथी डवरी समाजाच्या पाठीशी आम्ही सदैव राहू : मा.खासदार राजू शेट्टी

0
636

कोल्हापूर – घोसरवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथे झालेल्या नाथपंथी डवरी समाज मेळावा व डमरू व गीत गायन स्पर्धेचे आयोजन समस्थ डवरी समाज घोसरवाड येथील समाज यांच्याकडून केले होते.

यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी डवरी समाजाच्या पाठीशी कायम राहू असे प्रतिपादन केलं व आदिनाथ डवरी मेतके यांना समाजरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी श्री.आदित्य यड्रावकर , शिवराम डवरी, विजितसिंह शिंदे सरकार, साहेबराव साबळे, गुरुवर्य विठ्ठल डवरी महाराज, बाळ डवरी, रोहित डवरी,हे प्रमुख उपस्थित होते.

यावेळेस स्पर्धकांना माजी खासदार. राजू शेट्टी व आदित्य यड्रावकर यांनी शुभेच्छा दिला. यावेळी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाज बांधवांचा सत्कार व सन्मान करण्यात आला.


डमरू गीत गायन स्पर्धेमध्ये गोरख डवरी सोनवडे यांच्या संघाचा प्रथम क्रमांक आला. द्वितीय क्रमांक गुरुनाथ डवरी बड्याचीवाडी ,गडहिंग्लज ,तृतीय क्रमांक रोहित डवरी कुकुडवाडी ,राधानगरी , चतुर्थ क्रमांक गोपीनाथ डवरी खोची ,हातकणंगले पंचम क्रमांक विजय डवरी मळगे. या सर्व संघानी उत्कृष्ट गीते सादरीकरण केले.


हा स्नेह मेळावा यशस्वी करण्यासाठी राजेंद्र डवरी बाबासो डवरी बाबुराव डवरी शिवाजी डवरी काशिनाथ डवरी अंजना डवरी व समस्त नाथपंथी डवरी समाज गोसरवाड व सचिन डवरी यांनी सूत्रसंचालन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here