SP9 कोकरूड प्रतिनिधी प्रतापराव शिंदे
विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धेत आपले कौशल्य दाखवावे असे प्रतिपादन दत्त सेवा सहकारी पतपेढीचे संस्थापक आनंदराव मांईंगडे यांनी केले ते तुरुकवाडी तालुका शाहुवाडी येथे दत्तसेवा विद्यालयाच्या प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते
यावेळी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक गणेश पाटील प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका लता हरवले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना माइंगडे पुढे म्हणाले की खेळामध्ये हार जीत होत असते परंतु खिलाडू वृत्तीने विद्यार्थ्यांनी चांगला खेळ दाखवावा.
याप्रसंगी कबड्डी स्पर्धेचा पहिला सामना मान्यवरांच्या हस्ते टॉच उडवून प्रारंभ करण्यात आला. यावेळी उच्च माध्यमिक विभागाच्या क्रिडा शिक्षक अंजली पाटील, माध्यमिक विभागाचे सरदार महापौर, सुनील गांगुडेॅ, होस्टेल अधीक्षक प्रमोद पाटील, प्रणव पाटील, प्रतिक शिंदे
, प्राथमिकचे क्रिडा शिक्षक अर्जुन मस्कर, रविंद्र येसले आदींसह सर्व शिक्षक स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होते.