SDR फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि के आय एस समूहाच्या चीप ॲडव्हायझर डॉ. सीमा अनिल इंग्रोळे यांची औद्योगिक व सामाजिक क्षेत्रात कौतुकास्पद यश व उंच भरारी..

0
256

प्रतिनिधी : प्राध्यापिका मेघा पाटील

कोल्हापूर/ महाराष्ट्र : SDR फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि के आय एस समूहाच्या चीप ॲडव्हायझर डॉ.सीमा अनिल इंग्रोळे यांची औद्योगिक व सामाजिक क्षेत्रात कौतुकास्पद यश संपादन केले आहे.त्यांनी केलेले काम खरोखर अभिमानास्पद आहे.के आय एस आणि venturiq ने 27 डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील विविध ठिकाणी नेपियर ग्रास वर आधारित 11 बायो सीएनजी प्लांट्स उभारण्यासाठी ऐतिहासिक करार केला आहे.डॉ.सीमा अनिल इंग्रोळे यांच्या जिद्द ,चिकाटी आणि प्रयत्नामुळे हे यश शक्य झाले आहे.त्या सतत कामात व्यस्त असतात.त्यांना सामाजिक कार्यात खूप आवड आहे.त्यांनी SDR फाउंडेशनच्या माध्यमातूनन महाराष्ट्रात व देशात अनेक उपक्रम राबवले आहेत.त्यांनी केलेले निस्वार्थी काम हे खूप कौतुकास्पद व अभिमानास्पद आहे.स्त्री ही कोणत्याही क्षेत्रात काम करू शकते व आपले स्वतःचे अस्तित्व प्रस्थापित करू शकते हे डॉ. सीमा अनिल इंग्रोळे यांनी दाखवून दिले आहे.त्यांचे इतर ही महिलांनी आदर्श घ्यावा असे कौतुकास्पद त्या काम करत आहेत.या कामासाठी त्यांच्या सोबत त्यांचे पती अनिल इंग्रोळे यांची सदैव साथ असते.त्या करत असलेल्या कामामध्ये सहकार्य व मार्गदर्शन करत असतात.

KIS ग्रुप टीम सोबत डॉ.सीमा अनिल इंग्रोळे


या बायोसीएनजी प्लांटमुळे 2500 लहान शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावण्यासाठी थेट मदत होईल, जवळपास 250 लोकांना रोजगार मिळेल. बायोसीएनजी हे नूतनीकरणीय कच्च्या मालापासून तयार केले जाते आणि ते नूतनीकरण न करता येणार्‍या स्त्रोतापासून तयार होणाऱ्या नैसर्गिक वायूची जागा घेईल.
या करारातील सहभागी खालीलप्रमाणे आहेत.
1 वेंतुरिक बायोफ्यूल्स प्रायव्हेट लिमिटेड, कोल्हापूर
2 करमाळा, सोलापूर
3 युगंधरा नॅचरल गॅस प्रायव्हेट लिमिटेड, अहमदनगर
4 परतूर जैवइंधन प्रायव्हेट लिमिटेड, जालना
5 एस्टी नॅचरल गॅस प्रायव्हेट लिमिटेड, सोलापूर
6 सरदेसाई बायोसीएनजी प्रायव्हेट लिमिटेड, कोल्हापूर
7 दत्तकृपा अक्षय इंधन आणि निसर्ग काळजी प्रा. लि
8 छत्रपती शाहू महाराज बायोफ्यूल्स प्रा. लि
9 अमरगोल्ड बायोफ्यूल्स प्रायव्हेट लिमिटेड, कोल्हापूर
10 उर्जा रीजनरेशन प्रायव्हेट लिमिटेड, सातारा
11 धन अशोक बायोफ्यूल्स प्रायव्हेट लिमिटेड,पुणे

याचबरोबर नुकतेच भारताचे केंद्रीय मंत्री माननीय नितीन गडकरी यांची भेट डॉ.सीमा इंग्रोळे यांनी घेतली.

त्यांनीमाननीय नितीन गडकरी यांना आपण करत असलेले एस डी आर फाउंडेशनएस डी आर फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिकक उपक्रम आणि औद्योगिक क्षेत्रामधील करत असलेले कामा संदर्भात त्यांनी माहिती दिली.त्यामध्ये प्रेस मडवर आधारित बायो सीएनजी प्रोजेक्ट प्रत्येक साखर कारखान्यात उभारण्यासाठी केलेल्या प्रयत्नाची माहिती दिली.त्यांचे हे काम पाहून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कौतुक व मार्गदर्शन केले.आणि यााठी जे काही मदत लागेल ती मदत करायला मी तयार आहे अशी त्यांना ग्वाही दिली.या कामासाठी त्यांना प्रोत्साहन व मार्गदर्शन केले.


डॉ.सीमा अनिल इंग्रोळे यांच्या येत्या वर्षात संपूर्ण भारत देशात ठीक ठिकाणी बायो सीएनजी प्रोजेक्ट उभारण्याचा मानस आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here