Success Story: एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी तुमच्या मनामध्ये जिद्द आणि संघर्षाची तयारी असेल तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखु शकत नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे मिसेस बेक्टर फूड स्पेशालिटीजच्या संस्थापक रजनी बेक्टर.पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या रजनी बेक्टर या असंख्य गृहिणींपुढे आदर्श घातलाय.
कठोर परिश्रमांना प्रामाणिकतेची जोड देत त्यांनी हा व्यवसाय थाटला. एका सामान्य गृहिणीने व्यवसायात घेतलेली झेप अनेकांना प्रेरणादायी आहे.
रजनी बेक्टर या सुप्रसिद्ध मिसेज बेक्टर फूड स्पेशियलिटीज कंपनीच्या मालकिण आहेत. त्यांचा इथपर्यंत पोहचण्याचा प्रवास काही सोपा नव्हता. राहत्या घरातून आपल्या त्यांनी या व्यवसायाचा श्रीगणेशा केला. आजच्या घडीला त्यांची कंपनी इंग्लिश ओव्हन नावाने ब्रेड बनवते तर क्रेमिका नावाने बिस्किटांचे उत्पादन घेते. मॅकडोनाल्ड आणि बर्गर किंगसारख्या प्रसिद्ध कंपन्या त्यांच्या ग्राहक आहेत.
रजनी बेक्टर यांचा व्यवसायिक प्रवास अनेकांना थक्क करणारा आहे. पाकिस्तानच्या कराचीमध्ये जन्मलेल्या रजनी बेक्टर यांचे बालपण लाहोरमध्ये गेले. १९४७ च्या भारत-पाक फालणी दरम्यान त्यांच्या कुटुंबियांनी भारताची वाट धरली. त्यानंतर अवघ्या १७ वर्षांच्या असताना रजनी यांनी लुधियानामधील धरमवीर बेक्टर यांच्यासोबत विवाहबद्ध झाल्या.
गृहिणी ते बिजनेसवूमनचा प्रवास:
लग्नानंतर रजनी बेक्टर यांना तीन आपत्यांना जन्म दिला. चूल आणि मुल या ऐवढ्या विश्वात मिसेस बेक्टर रमल्या होत्या. पण काहीतरी करुन दाखवण्याची जिद्द त्यांना झोपू देत नव्हती.
रजना बेक्टर यांना बालपणापासून कुकिंगची आवड होती. आपल्या आवडीची सवड निर्माण करत रजनी बेक्टर यांनी नवा पर्याय निवडला. पंजाब विद्यापीठातून बेकिंग कोर्सला प्रवेश घेत त्यांनी नव प्रवास सुरु केला.
स्वत तयार केलेले बेकरी प्रोडक्ट्स तसेच वेगवेगळे केक्स, बिस्किटे बनवुन त्या लोकांना चाखायला द्यायच्या. असा त्यांच्या नित्यक्म असायचा. हळूहळू जम बसल्यानंतर रजनी यांनी क्रिमिका नावची पहिली कंपनी सुरु केली. त्यानंतर १९७० मध्ये आईस्क्रिम बनवण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे त्यांची व्यवसायिक कारकिर्द रोमंचक ठरली.
गृहिणीची कमाल:
प्रारंभिच्या काळात त्यांनी हा व्यवसाय उभा राहण्यासाठी तारेवरची कसरती केली. १९७८ मध्ये तब्बल २० हजार रुपयांची गुंतवणुक करत त्यांनी बिस्किट ,कुकीज तसेच चविष्ट असे केक बनवायला सुरुवात केली. बेकिंग प्रोडक्ट्स बनवण्यात पटाईत असलेल्या रजनी यांचा हा संघर्ष अखेर फळाला आला. या व्यवसायात पाऊल ठेवल्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. स्वत: मेहनतीच्या जोरावर या बिझनेस लेडीने ६ कोटी रुपयांचे बिझनेस साम्राज्य उभं केलंय.
पद्मश्री पुरस्काराने सन्मानित :
आज पाहायला गेल्यास मिसेस बेक्टर कंपनीचा विस्तार ६० हून अधिक देशांमध्ये झाला आहे. रजनी बेक्टर यांची कंपनी मॅकडोनाल्ड आणि बर्गर किंग या फास्ट फूड चेन्सना ब्रेडचा पुरवठा करते. २०२० मध्ये कंपनी शेअर बाजारात लिस्ट झाली. आज मिसेस बेक्टर फूड स्पेशालिटीजचे बाजार भांडवल 6 हजार कोटींहून अधिक आहे. २०२१ मध्ये रजनी बेक्टर यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.