कोल्हापूर : कोल्हापूरातील घनकचऱ्याचा प्रश्न महिन्याभरात मार्गी लागेल अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी सांगितले.
१७४ पैकी १६० ऑटो टिप्पर कार्यरत असून ३० टिप्पर खरेदी करण्यात येतील.
कसबा बावडा झूम प्रकल्पावरील जुना १,६७, ८७३ टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी १५ दिवसात वर्कऑर्डर देण्याची कार्यवाही होणार आहे. येथून सध्या ओला १४० आणि सुका ६० असा २०० टन कचरा उचलला जातो.
दैनंदिन १८० टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येते. यासाठी रिकार्ट या कंपनीसोबत २० वर्षासाठी करार होत असून महिन्याभरानंतर हा कचऱ्याचा डाेंगर झिरो होईल असे मुश्रीफ यांनी सांगितले.
-परिवहन उपक्रमासाठी आलेल्या १०० ईबसेसच्या डेपोसाठी १८ कोटी, पॉवर सप्लायसाठी बुध्द गार्डन वर्कशॉपपर्यंत वीजपुरवठा, ३३ केव्हीए लाईन ट्रान्सफार्मर उभारणीसाठी १७ कोटीचे अंदाजपत्रक सादर केले आहे.
-डीपीडीसी अनुदानातून महापालिकेस आजअखेर नगरोत्थान, दलितेतर, दलित वस्ती, मुलभूत योजनेतून आज अखेर २३९.३३ कोटींचा निधी मिळाला असून त्यातून एकुण २५४ कोटींची कामे प्रस्तावित आहेत.
-राष्ट्रीय स्वच्छ हवा योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून आलेल्या १६ कोटी ९६ लाख रुपयांच्या निधीतून टेंबलाई उड्डाण पूल, दाभोळकर कॉर्नरसह शहरातील विविध परिसरात एअर प्युरिफायर मशीन बसविण्यात येणार आहे.
-जकात सुरु होती, तेव्हा आकृतीबंध केला होता, त्यानंतर आता नव्याने आकृतीबंध सादर करण्यात येईल.
-बिंदू नामावलीसंदर्भात लवकरच प्रधान सचिवांसोबत चर्चा करण्यात येईल.