प्रोटीन्ससाठी (Protein) लोक आपल्या आहारात सप्लिमेंट्स, मांसाहाराही पदार्थांचा समावेश करतात. पण या पदार्थांमधून जास्त प्रोटीन मिळेलच असं नाही. काही स्वस्त आणि पोष्टीक भाज्यांमधून तुम्हाला भरपूर ताकद मिळेल.
(Top Vegetarian Protein Sources) व्यक्तीला निरोगी राहण्यासाठी प्रोटीन्सची आवश्यकता असते. प्रोटीन एक मॅक्रो न्युट्रिएंट आहे ज्याची शरीराला भरपूर आवश्यकता असते. हे अमिनो एसिडपासून तयार झालेले आहे. भाज्या आणि शेंगांमध्ये फायबर्स, व्हिटामीन्स मिनरल्स आणि कमीत कमी कॅलरीज असतात. (Veg Protein Rich Food)
१) चवळी
चवळी, राजमा सोयाबीन यात समान प्रमाणात प्रोटीन्स असतात. प्रोटीन्सशिवाय यात हेल्दी कार्ब्स, आयर्न, सोडियमसुद्धा असते. रिपोर्टनुसार यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटामीन ए, पोटॅशियमसुद्धा असते.
२) हिरवे सोयाबीन
हेल्थलाईनच्या रिपोर्टनुसार हिरवे सोयाबीन ताकद आणि बळकटीसाठी भंडार आहेत. इंग्रजीत याला Edamame असं म्हणतात. यातून चिकन मटन खाण्याप्रमाणे अमिनो एसिड्स मिळतात. ज्याची शरीराला जास्त गरज असते. यात कमी कॅलरीज असतात ज्यामुळे वजन नियंत्रणात राहतं याशिवाय कोलेस्टेरॉल लेव्हलही नियंत्रणात राहते.
रात्री पोटभर भात खाल्ला तरी पोट सुटणार नाही, भातासोबत खा ‘हा’ पदार्थ, पारंपरिक सोपा उपाय
३) बदाम
भाज्यांव्यतिरिक्त ड्रायफ्रट्स प्रोटीन्सचा चांगला स्त्रोत आहेत. यात हेल्दी फॅट्स असतात. ज्यामुळे घातक कोलेस्टेरॉल शरीरातून बाहेर निघण्यास मदत होते. त्वचा आणि केसही चांगले राहतात. रोज बदाम, पीक नट्स, अक्रोड याचे सेवन करायला हवे.
४) क्विनोआ
व्हिनोआ एक हाय प्रोटीन धान्य आहे. दलिया खिचडीमध्ये तुम्ही क्विनोआचा वापर करू शकता. वजन कमी करण्याासठी हा सगळ्यात चांगला ऑपश्न आहे. ज्यामुळे शरीराची अतिरिक्त चरबी कमी होण्यासही मदत होते. यातून व्हिटामीन्स, मिनरल्सही मोठ्या प्रमाणात मिळतात.
पोट खूप सुटलंय-धड व्यायामही होत नाही? रोज रिकाम्या पोटी हा पदार्थ घ्या-पोट होईल स्लिम
५) टोफू
जर तुम्हाला लॅक्टोजची एलर्जी असेल आणि दूध-पनीर जास्त खाऊ शकत नसाल तर टोफूचे सेवन करू शकता. हे सोयाबीनपासून तयार केले जाते. यातून शरीराला बरीच पोषक तत्व मिळतात. पनीरप्रमाणे दिसणाऱ्या टोफूच्या सेवनाने शरीराला बरेच फायदे मिळतात.