
प्रतिनिधी : जानवी घोगळे
कोल्हापूर प्रतिनिधी पांडुरंग फिरींगे:
पशुधनातील संतुलित आहार, वैरण लागवड वाढ, आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब आणि शेतकऱ्यांचे उत्पादनक्षमता वाढविणे या उद्देशाने पशुसंवर्धन विभाग, कोल्हापूरतर्फे एक भव्य तांत्रिक मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. राजर्षी शाहू सभागृह, शासकीय विश्रामगृह येथे शुक्रवार दि. 05 डिसेंबर रोजी दुपारी 2 ते 4 या वेळेत ही कार्यशाळा अत्यंत उत्साहात संपन्न झाली.
कार्यक्रमाचे उद्घाटन व मान्यवरांची उपस्थिती
या कार्यशाळेचे उद्घाटन मा. ना. श्री. प्रकाश आबिटकर
(मंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण तथा पालकमंत्री, कोल्हापूर) यांच्या शुभहस्ते झाले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते –
मा. ना. श्री. हसन मुश्रीफ
(मंत्री, वैद्यकीय शिक्षण, महाराष्ट्र)
मा.ना.श्रीमती माधुरी मिसाळ
(राज्यमंत्री, नगर विकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्यांक विकास, औकाफ तथा सह-पालकमंत्री, कोल्हापूर)
मा. श्री. राजेश क्षीरसागर
(कार्यकारी अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ)
विशेष उपस्थिती
मा. खा. श्री. धनंजय महाडिक – राज्यसभा सदस्य
मा. खा. श्रीमंत शाहू छत्रपती – लोकसभा सदस्य
मा. खा. श्री. धैर्यशील माने – लोकसभा सदस्य
प्रमुख उपस्थिती – जनप्रतिनिधींची भव्य फळी
मा.आ.श्री. सतेज पाटील – विधान परिषद सदस्य
मा.आ.श्री. जयंत आसगांवकर – विधान परिषद सदस्य
मा.आ.श्री. अरुण लाड – विधान परिषद सदस्य
मा.आ.श्री. विनय कोरे – आमदार
मा.आ.श्री. राजेंद्र पाटील (यड्रावकर) – आमदार
मा.आ.श्री. चंद्रदीप नरके – आमदार
मा.आ.श्री. अमल महाडिक – आमदार
मा.आ.श्री. शिवाजी पाटील – आमदार
मा.आ.श्री. अशोकराव माने – आमदार
मा.आ.श्री. राहुल आवाडे – आमदार
प्रशासनातील मान्यवर
मा. श्री. अमोल येडगे (भा.प्र.से.) – जिल्हाधिकारी, कोल्हापूर
मा. श्री. कार्तिकेयन एस. (भा.प्र.से.) – प्रशासक व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर
श्री. संतोष जोशी – अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर
कार्यशाळेचा उद्देश व महत्त्व
कार्यशाळेत जिल्ह्यातील शेतकरी, पशुपालक आणि तांत्रिक अधिकारी यांना—
चारा उत्पादनातील आधुनिक तंत्रज्ञान,
संतुलित आहाराचे महत्त्व,
उच्च प्रतीच्या वैरण पिकांची लागवड पद्धती,
पशुधनासाठी पोषण व्यवस्थापन,
याबाबत सविस्तर मार्गदर्शन देण्यात आले.
तज्ज्ञांनी शेतकऱ्यांच्या शंका निरसन करून उत्पादनवाढीसाठी आवश्यक टिप्स दिल्या. जिल्ह्यातील पशुपालन क्षेत्र अधिक बळकट करण्यासाठी ही कार्यशाळा मोलाची ठरली.
कार्यक्रम आयोजक
डॉ. प्रमोद बाबर
सहायक आयुक्त, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, जिल्हा परिषद, कोल्हापूर
डॉ. महेश शेजाळ
जिल्हा उपआयुक्त, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, कोल्हापूर
तसेच जिल्हा परिषद, कोल्हापूर येथील सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.

