
(वैजाक) आंध्र प्रदेश येथे होणाऱ्या ६३ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्केटिंग स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंच्या समवेत आंतरराष्ट्रीय स्केटिंग प्रशिक्षक प्रा. डॉ महेश कदम, जगताप, आपके, पटेल, बराडे यांची राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड कोल्हापूर:-रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने (वैझाक) आंध्र प्रदेश येथे ६ ते १५ डिसेंबर २०२५या कालावधीत होणाऱ्या ६३ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्केटिंग स्पर्धेसाठी स्केटिग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने मुंबई, पुणे येथे राज्य अजिंक्यपद स्केटिंग स्पर्धा व निवड चाचणी घेण्यात आली. यातून महाराष्ट्र राज्याचा संघ निवडण्यात आला. यामध्ये आमच्या कोल्हापूर जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या सात स्केटिंग खेळाडूंची महाराष्ट्र राज्याच्या स्केटिंग संघात निवड झाली आहे. निवड झालेले खेळाडू पुढील प्रमाणे रोलर हॉकी१)साकेत आपके २)श्लोक पटेल.३) हर्षवर्धन जगताप. रोलर डरबी ४) वीरश्री कदम (न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज). रोलर डर्बी ५) बराडे वेदांत (एफ. ए .आय) नालंदा कॅम्पस नागाळा पार्क) रोलर डरबी६) तेजस्विनी कदम.७) धनश्री कदम.या सर्वांची स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चे अध्यक्ष पी के सिंग यांनी निवड जाहीर केली वरील सर्वांचा जिल्हा संघटनेच्या वतीने राजश्री छत्रपती शाहू महाराज समाधी परिसर या ठिकाणी गौरव करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. सर्वांना जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अनिल कदम, ॲड.धनंजय पठाडे. प्राचार्य अभयकुमारजी साळुंखे. प्रा. आकाराम पाटील. यांचे मार्गदर्शन तर आंतरराष्ट्रीय स्केटिंग प्रशिक्षक प्रा. डॉ.महेश अभिमन्यू कदम. राष्ट्रीय कोच भास्कर कदम. यांचे प्रशिक्षण लाभले.माननीय, संपादकसो,——– वरील वृत्त आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिद्ध करून सहकार्य करावे ही नम्र विनंती. (प्रा. डॉ.महेश कदम)

