
प्रतिनिधी :पांडुरंग फिरिंगे
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आयोजित करण्यात आलेली ‘अभय चषक’ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2025-26 अत्यंत उत्साहात आणि चुरशीच्या सामन्यांनी पार पडली.या स्पर्धेत संस्थेच्या महाराष्ट्रातील विविध शाखांमधील शाळा व महाविद्यालयांचे एकूण 38 संघ सहभागी झाले होते. स्पर्धेच्या प्रत्येक टप्प्यावर खेळाडूंनी कौशल्य, संघभावना व क्रीडावृत्तीचे दर्शन घडवले.
अंतिम सामन्यात थरारक लढत
अंतिम सामना डी.के.ए.एस.सी. कॉलेज, इचलकरंजी आणि श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था मुख्य कार्यालय या संघांमध्ये झाला. प्रथम फलंदाजी करत डी.के.ए.एस.सी. कॉलेज संघाने 8 षटकांत 80 धावांचे आव्हान उभे केले. त्याला प्रत्युत्तर देताना संस्था मुख्य कार्यालयाच्या संघाने अवघ्या 5.2 षटकांत 82 धावा करत दणदणीत विजय मिळवून अभय चषकावर आपले नाव कोरले.
साद मुजावर ठरले सामनावीर
या विजयात साद मुजावर (नाबाद 56 धावा व 1 बळी) यांची उत्कृष्ट कामगिरी निर्णायक ठरली. कर्णधार अमित साळुंखे व उपकर्णधार प्रशांत कांबळे यांचे नेतृत्व विशेष उल्लेखनीय ठरले.
तृतीय क्रमांक – लाल बहादूर शास्त्री कॉलेज, सातारा.
वैयक्तिक पुरस्कार विजेते
उत्कृष्ट फलंदाज : संजय शेडगे (धाराशिव)
उत्कृष्ट गोलंदाज : दादा माळी (धाराशिव)
मालिकावीर : मुजफ्फर लगीवाले (इचलकरंजी)
उत्कृष्ट झेल : रोहन जाधव (सातारा)
उत्कृष्ट क्षेत्ररक्षक : रोहन निगवे (संस्था, कोल्हापूर)
मान्यवरांची उपस्थिती
बक्षीस समारंभासाठी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. कौस्तुभ गावडे, मा. मुरलीधर गावडे, मा. हितेंद्र साळुंखे, माजी जिमखाना विभाग प्रमुख एम. जी. गायकवाड, प्रा. किरण पाटील, प्राचार्य एस. के. खाडे, ॲड. हितेश राणींगा, सुहास थोरात, अभय निंबाळकर, अभिजीत कोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यशस्वी आयोजनासाठी सहकार्य
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात, रजिस्ट्रार श्री. एस. के. धनवडे, जिमखाना विभागप्रमुख डॉ. विकास जाधव यांच्यासह प्रा. संतोष कुंडले, प्रा. समीर पठाण, प्रितेश पाटील, किशोर मेथे, नौशाल पुरी, संजय भोसले, मंगेश मगदूम व सुरेश चरापले यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

