
प्रतिनिधी : प्रमोद पाटील
आज कोल्हापूरचे सामाजिक कार्यकर्ते व सिटीझन फोरमचे अध्यक्ष प्रसाद जाधव ह्यांनी आंतरराष्ट्रीय मुंबई मॅराथाॅन मधे सहभागी होऊन कृतज्ञता दौंड पूर्ण केली. गेले १० वर्षे सातत्याने ते आंतरराष्ट्रीय मुंबई मॅराथाॅन मधे सहभागी होऊन ४१ किलोमीटर मॅराथाॅन रन पूर्ण करून ते कोल्हापूरच्या प्रश्नाची देशपातळीवर दखल घेतली जावी म्हणून प्रयत्नशील असतात गेले १० वर्षे कोल्हापूर मधे हायकोर्टाचे सर्किट बेंच व्हावे म्हणून त्या मागणीकडे देशांबरोबर राज्याचे लक्ष वेधण्याचे सातत्याने प्रयत्न करत होते कधीकधी अतिरिक्त दौंड करून मुंबई हायकोर्ट प्रयत्न जाऊन निवेदन करत. परंतू यावर्षी कोल्हापूर मधे हायकोर्टाचे सर्किट बेंचची स्थापणा झाली त्याकरीता देशाचे मुख्य न्यायाधीश मा. भूषण गवळी यांनी मुख्य भूमिका बजावली म्हणून त्यांची उतराई म्हणून त्यांच्या प्रती कोल्हापूरकराच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ते याही वर्षी पुनश्च या मॅराथाॅन मधे सहभागी होऊन Victory Run Salute Hon. Retired chief justice Bhushan Gavai Sahebwe obige for a lifetime forver या टॅगलाईन सह धाव पूर्ण केली व मा.भूषण गवई ह्यांच्या प्रती आदरभाव व्यक्त केला.

कोल्हापूरकर कोल्हापूरचा विकासास सहकार्य करण्यार्याला कधीही विसरत नाहीत हा येथील मातीचा गुणधर्म आहे हे आपल्या कृतीने त्यांनी दाखवून दिले आणि तसेच लवकरात लवकर सर्किट बेंचचे रुपांतर हे कोल्हापूर हायकोर्ट बेंचमधे व्हावे अशी साद प्रसाद जाधव ह्यांनी मुंबईत घातली.कालच कोल्हापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.व्ही.आर. पाटील, उपाध्यक्ष ॲड. टी. एस. पाडेकर, सेक्रेटरी ॲड.मनोज पाटील,महिला प्रतिनिधी ॲड. मनीषा सातपुते, कार्यकारिणी सदस्य ॲड. स्नेहल गुरव, सांगली येथील ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. हंबीरराव पाटील, माजी अध्यक्ष ॲड. राजेंद्र चव्हाण, ॲड. प्रशांत शिंदे, ॲड. रणजित गावडे उपाध्यक्ष, सेक्रेटरी. आणि अनेक वकील ह्यांनी त्यांना ह्या मॅराथाॅन साठी शुभेच्छा दिल्या होत्या. यावेळी राजेंद्र थोरावडे,उदय लाड, गौरव लांडगे हृयांनी त्यांना सहकार्य केले.


