महावीर एन.सी.सी.ची दैदिप्यमान परंपरा कायम

0
9

प्रतिनिधी : जानवी घोगळे

सिनिअर अंडर ऑफिसर सृष्टी वेदपाठक ची 26 जानेवारी 2026 प्रजासत्ताक दिन परेड व पंतप्रधान रॅली साठी निवड
राष्ट्रीय छात्र सेने मधील सर्वात प्रतिष्ठित आणि सर्वात कठीण निवड प्रक्रिया असणारे शिबिर म्हणजेच 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन परेड व पंतप्रधान रॅली. नुकतेच आपल्या महाविद्यालयातील एन.सी.सी. छात्र सृष्टी वेदपाठक (बी.ए.III मानसशास्त्र विभाग ) हिची 26 जानेवारी 2026 रोजी दिल्ली या ठिकाणी होणाऱ्या प्रजासत्ताक दिन परेड व पंतप्रधान रॅली साठी निवड झाली. ऑगस्ट महिन्यापासून ही निवड प्रक्रिया निरंतर सुरू राहिली. यामध्ये कोल्हापूर मध्ये पाच व पुणे या ठिकाणी पाच शिबिरांमध्ये भारतीय सैन्य दलाच्या कर्नल,लेफ्टनंट कर्नल या रँकच्या अधिकाऱ्यामार्फत प्रत्येक शिबिरामध्ये सृष्टीची निवड तिच्या उत्कृष्ट कामगिरीच्या माध्यमातून होत गेली. व आज अंतिम निवड होऊन RDC 2026 दिल्लीसाठी तिची निवड झाली.
संस्थेचे चेअरमन आदरणीय ॲड. के. ए. कापसे साहेब, व्हॉइस चेअरमन ॲड. अभिजीत कापसे साहेब, सचिव मा.मोहन गरगटे साहेब व सर्व संचालक मंडळ तसेच माझी प्राचार्य डॉ. आर पी लोखंडे व विद्यमान प्राचार्य डॉ. अद्वैत जोशी सर यांचे नेहमीच एनसीसी विभागाला मार्गदर्शन मिळते. यातूनच मागील सलग पाच वर्षे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन परेड व पंतप्रधान रॅली साठी महाविद्यालयातील एनसीसी छात्र निवडले जातात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here