कोल्हापूरच्या महापौरपदी प्रभाग क्रमांक १८ च्या रूपाराणी निकम (भाजपा) यांची वर्णी

0
10

प्रतिनिधी : जानवी घोगळे

कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी अखेर प्रभाग क्रमांक १८ च्या नगरसेविका रूपाराणी निकम (भाजपा) यांची निवड निश्चित झाली आहे. महापौर पदासाठी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने शहराच्या राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

महापौर पदासाठी विविध नावांची चर्चा सुरू असताना अखेर रूपाराणी निकम यांच्या नावाला प्राधान्य देण्यात आले. पक्षांतर्गत बैठका, समन्वय आणि स्थानिक पातळीवरील त्यांच्या सक्रिय कामाची दखल घेत त्यांना ही संधी देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

रूपाराणी निकम या प्रभाग क्रमांक १८ मधून निवडून आलेल्या असून सामाजिक व नागरी प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. त्यांच्या निवडीमुळे महिला नेतृत्वाला बळ मिळाल्याची भावना भाजपा कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.

महापौर म्हणून शहर विकास, पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर त्यांनी लक्ष केंद्रित करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कोल्हापूर शहराला आता रूपाराणी निकम यांच्या रूपाने नवीन नेतृत्व मिळाले असून आगामी काळात त्यांच्या कार्यशैलीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here