
प्रतिनिधी :जानवी घोगळे
गतवर्षी पहेलगाम काश्मीर येते काही पर्यटकावर अंतकवादी लोकांनी हमला केला होता त्यामध्ये बरेचसे पर्यटक मृत्यूमुखी पडले त्याबद्दल सर्व जगानी व भारताने आंतकवादाचा बहिष्कार केला होता तसेच काश्मीरच्या पर्यटनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते त्यात कोणीही पर्यटक जायला इच्छुक नव्हते तसेच ज्या लोकांचे हॉटेल बुकिंग टूर बुकिंग झालेले होते ते सुद्धा कॅन्सल करत होते.कारणही ते स्वाभाविकच होतं परंतु पर्यटकावर झालेल्या हमला पर्यटन बंद करायचं हे आंतकवाद्याचं मिशन होतं त्यामुळे त्यांचं मिशन सक्सेस होईल असं काही करू नका म्हणून काही लोकांनी पर्यटकांना धीर दिला व देश पातळीवर सरकार पातळीवर तसेच काश्मीरच्या सरकार पातळीवर सुद्धा असे बरेचसे प्रयत्न झाले तरी पर्यटकावर जबरदस्तीने पाठवू नका अशी विचारणा होत राहिली भारत सरकार च्या पर्यटन विभागाने व काश्मीर सरकारने भारतातल्या काही टूर्स अँड ट्रॅव्हल असोसिएशनच्या अध्यक्षांची मीटिंग घेऊन त्यांना विनंती करून त्यांना पर्यटकांचं संरक्षण करण्याची जबाबदारी घेऊन त्यांना पर्यटक कश्मीरला पाठवा असे विनंती करण्यात आली होती कारण आ़ंतक वाद्याचे मिशन पूर्ण करू द्यायचं नव्हतं.त्यात (टाई)ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ इंडिया (टाफि), ट्रॅव्हल एजंट फेडरेशन ऑफ इंडिया महाराष्ट्र टूर ऑपरेटर असोसिएशन मुंबई ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ पुणे ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ नासिक ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ कोल्हापूर यांनी वारंवार आपले पर्यटक जशी जम्मू काश्मीरला पाठवत राहिले.यांना कृतज्ञता म्हणून काश्मीरचे मुख्यमंत्री श्रीमान ओमर अब्दुल्ला यांनी मुंबई नरिमन पॉईंट हॉटेल ट्रायडेंट मध्ये एका छोटेखाणी कार्यक्रमात या सर्वांचे अभिनंदन केले.

कोल्हापूरच्या ट्रॅव्हल एजंट असोसिएशनचे अध्यक्ष श्री बळीराम वराडे, उपाध्यक्ष श्री विनोद कंबोज ,तसेच मेंबर श्री ज्ञानेश्वर भस्मे यांनी अभिनंदन स्वीकारलं.या कार्यक्रमाला काश्मीर सरकार मधील पर्यटन मंत्री, पर्यटन सचिव, तसेच काश्मीर प्रांताचे खासदार श्री ओबेराय (राज्यसभा) व बरेचसे पर्यटन क्षेत्रातील मातब्बर लोक तसेच राजाराणी ट्रॅव्हल्स चे व महाराष्ट्र टूर असोसिएशनचे अध्यक्ष श्री विश्वजीत पाटील , श्री अभिजीत पाटील यांनी कार्यक्रमाचे आयोजन केलेलं होतं.

