
मुंबई | प्रतिनिधी
दृष्टी, विकास आणि विश्वास या त्रिसूत्रीवर उभ्या असलेल्या नेतृत्वाला महाराष्ट्राच्या जनतेने पुन्हा एकदा भक्कम पाठिंबा दिला आहे. मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस (देवाभाऊ)यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने मिळवलेला हा विजय केवळ निवडणूक निकाल नसून, तो महाराष्ट्राच्या भविष्यासाठी जनतेने दिलेला स्पष्ट जनादेश आहे.आज जाहीर झालेल्या निकालांमधून महाराष्ट्रातील सुजाण, जागरूक आणि विकासाभिमुख मतदारांनी विकसित महाराष्ट्राच्या संकल्पाला संपूर्ण समर्थन दिल्याचे स्पष्ट झाले आहे. देवाभाऊंच्या ठाम निर्णयक्षमतेवर, पारदर्शक प्रशासनावर आणि दूरदृष्टीपूर्ण विकास मॉडेलवर जनतेने पुन्हा एकदा विश्वासाची मोहोर उमटवली आहे.राज्यभरातून मिळालेल्या आघाड्या आणि विजय हे महायुतीच्या मजबूत संघटनशक्तीचे द्योतक असून, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बूथस्तरीय यंत्रणेने घेतलेल्या अथक परिश्रमांचे हे फलित असल्याचे बोलले जात आहे. प्रत्येक कार्यकर्त्याच्या निष्ठेला आणि संघर्षाला या विजयात मोलाचे स्थान आहे.देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने गेल्या काळात जागतिक दर्जाची पायाभूत सुविधा, मोठ्या प्रमाणावरील परकीय गुंतवणूक (FDI), रोजगारनिर्मिती आणि सुशासन या क्षेत्रांत भरीव प्रगती साधली आहे. त्याच विकासाच्या मार्गावर पुढे जाण्याचा निर्धार जनतेने या जनादेशातून अधोरेखित केला आहे.

दीर्घ रांगा लावून मतदान करणाऱ्या महाराष्ट्रातील लाखो मतदारांचे हे शहाणपणच या विजयाचे खरे सूत्रधार असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. मतदारांनी दिलेल्या विश्वासास आम्ही कृतज्ञतेने नतमस्तक असून, हा विश्वास अधिक जबाबदारीने निभावण्याची ग्वाही देण्यात आली आहे.विजय संकल्प हमारा,अनथक अविरत साधना…राष्ट्रधर्म आराधना”या भावनेतून हा विजय महाराष्ट्राच्या प्रगतीचा नवा अध्याय ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. अलौकिक विजय… अडिग नेतृत्व… आणि अडथळ्यांवर मात करणारा महाराष्ट्र!

