राधानगरीपोलिसांनी तब्बल १२ लाख ९७ हजाराचा मुद्देमाल जप्त 

0
95

 ओलवन दाजीपूर येथील ऋषिकेश स्टे होममध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून राधानगरीपोलिसांनी तब्बल १२ लाख ९७ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी भाडेतत्वाने चालवीत असणाऱ्या स्टे होमच्या मालकासह ६ जणांवर जुगार कायदा कलम ४ व ५ प्रमाणे गुन्हा दाखल आला.

ही कारवाई काल, रविवारी (३१ डिसेंबर २०२३) रोजी सायंकाळी ओलवन गावच्या हद्दीमध्ये करण्यात आली.

किशोर वासुदेव सामंत (वय ३४, रा.फोंडाघाट बोकलभाटले), प्रदीप अर्जुन पाटील (४९, रा.माठेवाडा, सावंतवाडी), प्रकाश दत्तात्रय साळवी (३८, रा. फोंडाघाट) आनंद चनाप्पा मेट्टी (३८, रा.कुडाळ), बाळू अशोक बाणे (३२, रा.फोंडाघाट झर्येवाडी), मिलिंद श्रीधर कुबडे (४५, रा.फोंडाघाट), व स्टे होमचा मालक सागर अनंत खंदारे (राधानगरी ओलवण) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

थर्टी फर्स्टच्या निमित्ताने काहीजण या स्टे होमजवळ रमी नावाचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांनी मिळाली. यामाहितीवरुन पोलिसांनी याठिकाणी छापा टाकला असता ७२ हजार रुपये रोख, २५ हजार किंमतीचे दोन मोबाईल, १२ लाखाची क्रेटा कार, असा मिळून १२ लाख ९७ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. अचानक पोलिसांनी कारवाई केल्याने पळापळ उडाली. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश घेरडीकर, दिगंबर बसरकर व कृष्णात यादव, यांच्यासह पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here