काँग्रेस 9 राज्यांमध्ये आघाडी करणार, INDIA आघाडीत जागावाटपाचा फॉर्म्युलाही ठरला…

0
84

I.N.D.I.A Alliance: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. सत्ताधारी भाजप रामललाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर उमेदवारांची घोषणा कर आहेत. तर, काँग्रेसने INDIA आघाडीतील जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळजवळ निश्चित केला आहे.

याची रिपोर्ट उद्या, बुधवारी (3 जानेवारी) काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना सोपवली जाईल.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, काँग्रेस 9 राज्यांमध्ये इतर पक्षांसोबत आघाडी करणार आहे. पण, पंजाबमध्ये आघाडीची शक्यता फारच कमी दिसते. काँग्रेसने या विषयावर राज्यातील नेत्यांशी चर्चा केली असून, अहवाल जवळपास तयार झाला आहे. हा अहवाल उद्या मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे सुपूर्द केला जाईल.

या राज्यांमध्ये युती होण्याची शक्यता
ज्या राज्यांमध्ये काँग्रेस आपल्या मित्रपक्षांसोबत आघाडी करू शकते, त्यात जम्मू-काश्मीर, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, केरळ आणि तामिळनाडू आहे.

काँग्रेस दिल्लीत अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पक्षाशी (आप) आघाडी करू शकते, पण पंजाबमध्ये या आघाडीची शक्यता कमी आहे.

YSRTP काँग्रेसमध्ये विलीन होणार
याशिवाय वायएस शर्मिला त्यांचा पक्ष YSR तेलंगणा पार्टी (YSRTP) काँग्रेसमध्ये विलीन करू होऊ शकतो. या आठवड्याच्या शेवटी वायएस शर्मिला दिल्लीत जातील आणि याची अधिकृत घोषणा करतील.

YS शर्मिला यांना राज्यसभा, AICC सरचिटणीस आणि आंध्र प्रदेश PCC ऑफर करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशात या वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, अशा स्थितीत काँग्रेस शर्मिला यांच्यावर मोठी जबाबदारी देऊन राज्यात पुन्हा उभे राहण्याचा प्रयत्न करेल. यापूर्वी तेलंगणा विधानसभा निवडणुकीतही शर्मिला यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here