सायकलिंग क्लब लोणावळा ची लोणावळा ते गोवा सायकल रेली

0
100

सायकलिंग क्लब लोणावळा हे नेहमीच समाजाला पर्यावरण सवर्धण व निरोगी आरोग्याचा संदेश देत असतो. या वर्षी सायकलिंग क्लब लोणावळाचे सदयस श्री.भरत भाऊ भरणे व श्री. नितेश कुटे यांच्या विचारणे व्यसन मुक्त समाज “सायकल चालवा निरोगी रहा” असा संदेश देत लोणवळा ते गोवा असा 23 डिसेंबर ते 25 डिसेंबर सायकल रेली आयोजीत करण्यात आली.

पहिला दिवस लोणवळा ते कराड असा सायकल प्रवास करुन तेथील लोकाना सायकल चालविण्याचे फायदे असा संदेश दिला. दुसरा दिवस कराड ते कोल्हापुर राधानगरी मार्गे दाजीपूर 150 कंटाळा कि. मी. प्रवास करुन प्रवासात लागणारी गावतील लहान मुले याना सायकल चालवण्यासाठी प्रेरित केले.

या मधे काही पुरुष मडळीं यानी लहानपणी च्या सायकल चालविण्याची आठवण सगितली वा परत आम्ही सायकल चालवणे सुरु करतो असा विश्वास ही दर्शविला.


तिसरा दिवस गोवा येथील युवा वर्ग समोर ठेऊन येनारया 31 डिसेंबर ला कोणतही व्यसन ना करता साजरा करण्याचे आव्हान केले. समृध्द भारत सुदृढ भारत ही संकल्पना राबविण्यासाठी एक पाऊल आपले लोणवळा सायकलिंग क्लब टाकत आहे. त्यासाठी महाराष्ट्र आणि महाराष्ट्रा बाहेर अशा रेली चे आयोजन करत आहेत.


या रेली मधे सर्व वयोगतील सदयस सहभागी झाली होती.
श्री. भरत भरणे, श्री. नितेश कुटे, श्री कैलास कडूस्कर, डॉ. प्रविण पंडीत लोणवळा आणि विट्ठल लोंढे, अक्षय अंबेकार पुणे हे सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here