महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी प्रशासनामार्फत होत आहे. शासनाच्या या योजना तालुक्यातील प्रत्येक घराघरांत पोहचल्या पाहिजेत.
तालुक्यातील मूळ लाभार्थी कोणत्याही शासकीय योजनेपासून वंचित राहणार नाही यासाठी मी कटिबद्ध असेन. तालुक्यात नागरीकांना जास्तीत-जास्त लाभ मिळण्यासाठी प्रशासनाच्या मदतीने आपले प्रयत्न असणार आहेत. त्यामुळे शासनाच्या सर्व कल्याणकारी योजना सर्वसामान्यांच्या दारी पोहचवणार आहेत.
यावेळी शासनाच्या रमाई आवास, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत, अहिल्याबाई होळकर धनगर, बांधकाम कामगार आवास, मोदी आवास, महिला बाल संगोपन, पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध अनुदान, आरोग्य विभागाचे गोल्डन कार्ड, रोजगार हमी, वैयक्तिक सिंचन, समाजकल्याण, संजय गांधी निराधार, दिव्यांग लाभार्थीच्या विविध योजना पंचायत समितीच्या आरोग्य विभाग, पशुसंवर्धन रोजगार हमी, समाजकल्याण विभागाकडून अनेक लाभार्थ्यांना प्रमाणपत्र व दिव्यांगाना साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी गोकूळचे संचालक अभिजित तायशेटे, माजी उपसभापती अरुण जाधव, गटविकास अधिकारी डॉ.संदीप भंडारे, सुभाष चौगले, सरपंच संघटनेचे अध्यक्ष नेताजीराव पाटील मांगोलीकर, जेष्ठनेते शामराव भावके, शिवाजीराव चौगले, विश्वनाथराव पाटील, अशोकराव वारके, मानसिंग पाटील, राजेंद्र वाडेकर, अरविंद पाटील, शहाजी पाटील, उपअभियंता सुरेश खैरे, श्री.कराड, गटशिक्षणाधिकारी बी.एम.कासार, तालुका आरोग्याधिकारी राजेंद्र शेटे, पशुधन विकास अधिकारी एम.आर.ससाणे, आनंदा शिंदे, प्रभाकर पाटील यांच्यासह तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य, ग्रामसेवक, पंचायत समितीचे सर्व खातेप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.