रोज गळून केस पातळ झालेत? १ चमचा गव्हाच्या पीठाचा ‘हा’ उपाय करा, लांब-दाट होतील केस

0
81

केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी लाईफस्टाईलमध्ये बदल करणं गरजेच असते. केस गरजेपेक्षा जास्त कोरडे झाले तर केसांच्या वाढीवर याचा परिणाम होऊ शकतो. केस वाढवण्यासाठी तुम्ही बायोटीन पावडरचा वापर करू शकता.

बायोटीन पावडर वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. (Easy Ways To Help Your Hair Grow) यामुळे हेअर ग्रोथ होण्यास मदत होते आणि केस डॅमेज होण्याचा धोकाही टाळता येते. केस मऊ, मुलायम होतात आणि केसांचे टेक्चर सुधारण्यासही मदत होते. केसांसाठी बायोटीन पावडर घरी कसं बनवता येईल ते पाहूया. (How to Grow Hairs Faster)

केसांच्या वाढीसाठी बायोटीन पावडर कशी तयार करावी? (How to make Biotin Powder For Hairs)

बायोटीन व्हिटामीन बी-७ आहे जे स्किन आणि केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. बायोटीन वॉटर सोल्यूबल व्हिटामीन आहे ज्यामुळे कॅरेटिन प्रोडक्शनमध्ये मदत होते. बायोटीनच्या वापराने केस हेल्दी राहण्यास मदत होते आणि केस सुंदर दिसतात. (How to Grow Hairs Faster)

मनगट बारीक पण दंडांची चरबी वाढलीये? १० मिनिटांचे २ व्यायाम, फॅट होईल कमी-टोन होतील हात

बायोटीन पावडर बनवण्यासाठी २ चमचे गव्हाचे पीठ, ३ चमचे ब्रूअरर्स यीस्ट आणि १ चमचा पाणी घ्या. हळूहळू हे मिश्रण एकजीव झाल्यांतर जाडसर पेस्ट तयारहोईल. हे मिश्रण एका ट्रेमध्ये घाला. आणि १ ते २ दिवस सुकू द्या. २५ ते ४८ तासांनी हे मिश्रण कुटून बारीक करा. तयार आहे बायोटीन पावडर, ही पावडर एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवा जेणेकरून गरम वातावरण आणि मॉईश्चर टिकून राहील.

ही बायोटीन पावडर तुम्ही केसांवर हेअर मास्कच्या स्वरूपात लावू शकता. पावडर पाण्यात मिसळून पेस्ट तयार करा. हा हेअर मास्क केसांना मुळांपासून पोषण देतो. जवळपास २० ते ३० मिनिटं हा हेअर मास्क केसांना लावलेला राहू द्या नंतर केस स्वच्छ धुवा. चांगल्या परिणामांसाठी तुम्ही आठवड्यातून २ ते ३ वेळा हा बायोटीन हेअर मास्क लावू शकता. ही पावडर केसांना लांब आणि दाट बनवते. ज्यामुळे हेअर ग्रोथही चांगली होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here