बाजार भोगाव येथे मंगल अक्षता कलश्याचा पालखी सोहळा मोठ्या धार्मिक व भक्तीमय वातावरणामध्ये संपन्न झाला

0
128

बाजार भोगाव

येथे मंगल अक्षता कलश्याचा पालखी सोहळा मोठ्या भक्तीमय वातावरणात संपन्न
पन्हाळा तालुक्यातील बाजार भोगाव येथे मंगल अक्षता कलशाचा पालखी सोहळा मोठ्या धार्मिक व भक्तीमय वातावरणामध्ये संपन्न झाला


सकल हिंदू समाज व श्री राम भक्त यांच्यावतीने काढण्यात आलेल्या पालखी सोहळ्याची सुरुवात श्री भोगेश्वर मंदिर येथून करण्यात आली


प्रदीर्घ कालखंडाच्या प्रतीक्षेनंतर श्रीराम जन्मभूमी आयोध्या येथे श्री प्रभू रामचंद्र यांच्या भव्य मंदिराची निर्मिती होत असून दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी श्री राम मंदिरामध्ये प्रभू रामचंद्रांची मूर्ती प्रतिष्ठापना होत आहे हा मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा

भारतातील प्रत्येक घरामध्ये मोठ्या जल्लोषात साजरा व्हावा या दृष्टीने बाजार भोगावा मधील प्रत्येक गल्लीमध्ये मंगल कलशाची पालखी सोहळ्याने मिरवणूक काढून आयोध्या येथून आलेल्या मंगल अक्षतांचे घरोघरी वाटप करण्यात आले


हा पालखी सोहळा पारंपारिक वाद्यांच्या गजरात संपन्न झाला यावेळी श्री भोगेश्वर भजनी मंडळ चाळकोबा भजनी मंडळ अनिरुद्ध उपासना केंद्र व श्री सत्यसाई सेवा समिती बाजार भोगाव यांच्यावतीने घेण्यात आलेल्या भजन सोहळ्यामुळे या कार्यक्रमाला आणखीनच शोभा प्राप्त झाली होती


या पालखी मिरवणूक सोहळ्यामध्ये सचिन खेडेकर सतीश माने रघुनाथ गवळी रमेश शिंदे बाळासो आयरे अजय पाटील भगवान पाटील शिवाजी पाटील संग्राम गवळी गजानन पानारी संदीप पोवार विनायक पानारी शिवाजी मोहन पाटील सुरज वडिंगेकर राहुल भनगे अक्षय पाटील शुभम घोडके प्रकाश कांबळे कपिल पोतदार सुशांत बाळासो पाटील संदीप पाटील नम्रता पाटील राजश्री भोगावकर अलका गांधी वर्षा हुरकुडली मृणाली कांबळे संपदा भनगे सविता पानारी नंदा पोतदार प्राजक्ता पाटील मनीषा वडिंगेकर सविता पाटील यांच्यासह बाजार भोगाव मधील सकल हिंदू समाज श्रीराम भक्त व महिलावर्ग पारंपारिक वेशभूषा मध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होता
तर लहान मुले व मुली पारंपारिक वेशभूषेमध्ये सहभागी झाले होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here