राधानगरी प्रतिनिधी विजय बकरे
प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियान अंतर्गत राधानगरी तालुक्यातील भरी बांबर गावामध्ये भेट देऊन आदिवासी लोकांची राहणीमान कसे असते त्याची पाहणी शासनाच्या आदेशाने करण्यात आली असल्याची माहिती राधानगरीच्या तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख यांनी दिली
भरी बांबर गावामध्ये आदिवासी लोक राहत आहेत, त्याची अडचणी काय् आहेत त्याची पाहणी करून , कातकरी लोकांना रेशन कार्ड, वोटर कार्ड ,आयुष्यमान कार्ड ,आधार कार्ड सुविधा तत्काळ उपलब्ध करून देण्यासाठी, आज सोमवारी तिथे कॅम्प लावलेला आला त्यानंतर त्याची वाटप करण्यात आले असे तहसीलदार श्रीमती देशमुख त्यांनी सांगितले
त्यावेळी पंचायत समिती चे गट विकास अधिकारी डॉक्टर संदीप भंडारे शिक्षण अधिकारी बी एमकासार आरोग्य अधिकारी राजेंद्र शेट्टी सर्कल ऑफिसर सुंदर जाधव पोलीस पाटील अनिल संकपाळ शाखा अभियंता चौगुले जमदाडे ग्रामसेवक स्वप्नील चौगुले सरपंच जयवंत पताडे सुपरवायझर आशा पाटील यांच्या उपस्थिती होती