पोट सुटलं-मांड्या जाडजूड दिसतात? थंडीत पपईच्या २-३ फोडी खा, सुटलेलं पोट होईल कमी

0
70

स्लिम फिट राहण्यासाटी वेट लॉस व्यायाम आणि डाएट करणं फार महत्वाचे असते. (Weight Loss Tips) वजन कमी करण्यासाठी पपई फायदेशीर ठरते. थंडीच्या दिवसात बाजारात ताजी पपई दिसायला सुरूवात होते.

(Can Papaya Help you to lose weight) पपई खाऊन तुम्ही वजन नियंत्रणात ठेवू शकता. पोषक तत्वांनी परिपूर्ण असलेली पपई वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी पपई कोणत्या पद्धतीने खायची ते समजून घेऊ. (Benefits Of Eating Papaya On Empty Stomach) पपईच्या ४ ते ५ फोडी तुम्ही दिवसभरात कधीही खाऊ शकता फक्त जास्त प्रमाणात खाऊ नका.

फायबर्सचा खजिना

पपईत मोठ्या प्रमाणात फायबर्स असतात ज्यामुळे वजन कमी करण्यासाठी पपई फायदेशीर मानली जाते. नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजी इन्फोर्मेसनमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार फायबर्सयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. फायबर्सचे सेवन केल्याने पोट जास्तवेळ भरण्यास मदत होते.

कमी कॅलरीज

लठ्ठपणा कमी करण्यासाठी लोक पपईचे सेवन करतात. यात कमीत कमी कॅलरीज असतात. १०० ग्राम पपईत ३२ कॅलरीज असतात. तुम्ही व्यायामाला जाण्याआधी किंवा नाश्त्यासाठी पपई खाऊ शकता ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल. वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर डाएट बरोबरच व्यायामही करा.

पोटावरची चरबी वाढली-डाएट जमतच नाही? नाश्त्याला खा ‘हे’ ५ लो कॅलरी पदार्थ, पोट होईल कमी

मेटाबॉलिझ्म वाढतो

मेटाबॉलिझ्मुळे तब्येतीवर सकारात्मक परिणाम होतो. यामुळे शरीराची उर्जा वाढते आणि जास्तीत जास्त कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. शरीराचे वजन नियंत्रण राहण्यासही मदत होते. एका संशोधनात पपई ला ‘एक्टिव्हेटर ऑफ मेटाबॉलिझ्म’ असं म्हटलं गेलं आहे.

शरीर डिटॉक्स होते

वजन कमी करण्यासाठी शरीराला डिटॉक्सिफिकेशन असं म्हटलं जातं. एका संशोधनात दिसून आलं आहे की पपई शरीरासाठी डिटॉक्सिफायरच्या स्वरूपात काम करते. वजन कमी करण्यासाठी पपई सहाय्यक ठरते. शरीर डिटॉक्स झाल्यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते.

मनगट बारीक पण दंडांची चरबी वाढलीये? १० मिनिटांचे २ व्यायाम, फॅट होईल कमी-टोन होतील हात

एंटी ओबेसिटी प्रभाव

पपईत एंटी ओबसिटी गुणधर्म असतात. एनसीबीआयच्या रिपोर्टनुसार यातील प्रभावामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. पिकलेली पपई सालं काढून बिया काढून तुम्ही याचे सेवन करू शकता. कच्ची पपई तुम्ही सॅलेड्सच्या स्वरूपात खाऊ शकता. साखर न घालता स्मूद बनवू शकता किंवा फ्रूट सॅलेडच्या स्वरूपात पपईचे सेवन करू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here