IND vs AFG 3rd T20I : अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात शून्यावर बाद झालेल्या रोहित शर्माने तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात १२१ धावांची धमाकेदार खेळी केली.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. रोहित शर्मा आणि रिंकू सिंग यांच्यातील १९० धावांच्या विक्रमी भागीदारीमुळे भारताने २१२ धावा केल्या.
अफगाणिस्तानने गुलबदिन नायबच्या झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर २१२ धावा करत सामना बरोबरीत आणला. प्रकरण सुपर ओव्हरपर्यंत पोहोचले. पहिल्या सुपर ओव्हरमध्येही निकाल लागला नाही, तेव्हा दुसरी सुपर ओव्हर झाली, ज्यामध्ये भारताचा विजय झाला. सामना आणि मालिका जिंकल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा खूप आनंदी दिसत होता.
सामनावीर म्हणून निवड झालेला कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, ‘हे शेवटचे कधी झाले ते मला आठवत नाही. मला वाटते की मी आयपीएलच्या एका सामन्यात तीन वेळा फलंदाजी केली आहे.
भागीदारी निर्माण करणे महत्त्वाचे होते. रिंकू आणि मी सतत बोलत होतो. २२ धावांत चार गडी गमावल्यानंतर प्रचंड दडपण होते आणि आमच्यासाठी बराच वेळ क्रीजवर राहणे महत्त्वाचे होते.
तसेच रोहितने रिंकूचे कौतुक केले. गेल्या काही मालिकांमध्ये रिंकूने दाखवून दिले की, तो बॅटने काय करू शकतो. तो खूप शांत आहे आणि त्याला त्याची ताकद चांगली माहीत आहे, असं रोहितने सांगितले. रिंकूने भारतासाठी खरोखरच चांगली कामगिरी केली आहे. तो भारतीय संघातही तशाच प्रकारची कामगिरी करण्याचा प्रयत्न करत आहे, असंही रोहित म्हणाले.
दरम्यान, भल्यामोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने शानदार फटकेबाजी करताना भारताच्या धावसंख्येशी बरोबरी साधली. फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरने १८ चेंडूत ३ बळी घेतले.
रहमानुल्लाह गुरबाड़झ (३२ चेंडूत ३ चौकार व ४ षटकारांसह ५० धावा), कर्णधार इब्राहिम झादरान (४१ चेंडूंत ४ चौकार व एका षटकारासह ५० धावा) आणि गुलबदिन नईब (२३ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ५५) यांनी सामना सुपर ओव्हरमध्ये नेण्यात मोलाची भूमिका निभावली, मोहम्मद नबीनेही (१६ चेंडूत ३४) शानदार फटकेबाजी केली.
यानंतर सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्ताने १६ धावा केल्या आणि भारतानेही १६ धावा केल्या. यामुळे पुन्हा एकद सुपर ओव्हर खेळविण्यात आली. यावेळी रोहितने एक षटकार व एक चौकार मारत दणक्यात सुरुवात केली. परंतु, नंतर रिकू आणि रोहित धावबाद झाल्याने भारताला केवळ ११ धावांवर समाधान मानावे लागले, यानंतर रवी बिश्नोईने पहिल्या व तिसऱ्या चेंडूवर अनुक्रमे नवी व गुरबाझ यांना झेलबाद करत भारताचा विजय निश्चित केला.