हिंदू राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर अमेरिकेची टिप्पणी! पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भातही केलं भाष्य

0
63

अमेरिकन परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी दावोस येथे आयोजित करण्यात आलेल्या वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या (WEF) वार्षिक बैठकीत पुन्हा एकदा भारताच्या मानवाधिकार आणि हिंदू राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे.

ब्लिंकन म्हणाले, यामुद्द्यावर अमेरिकेने नेहमीच भारतासोबत चर्चा केली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात भारताने जे यश संपादन केले आहे, ती असाधारण यशाची कहाणी आहे.

वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या कार्यक्रमात ‘तेजीने वाढत असलेल्या हिंदू राष्ट्रवादा’च्या मुद्यावर चिंता व्यक्त करण्यात आली. याला उत्तर देताना ब्लिंकन म्हणाले, ‘या मुद्यावर भारत आणि अमेरिका राजकीय पातळीवर सातत्याने बोलत आले आहेत. याच बरोबर आमच्या चर्चेत लोकशाही आणि मानवाधिकाराचा मुद्दाही असतो.’

‘राष्ट्रपती (ज्यो बायडेन) यांनी पदभार स्वीकारला, तेव्हाच अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात मानवाधिकार आणि लोकशाही संदर्भातील चिंता या दोन गोष्टी महत्व देण्यासाठी संपूर्ण प्रयत्न केला होता.

यासंदर्भात आम्ही वेगवेगळ्या देशांसोबत वेगवेगळ्या पद्धतीने बोलत आलो आहोत. काही देशांसोबत अशी चर्चा अधिक बोलकी असते. तर, काही देशांसोबत आमचे संबंध लक्षात घेता, खुलेपणाने चर्चा केली जाते. ज्याचे सकारात्मक परिणामही दिसून येतात. हीच स्थिती भारताची आहे, असे ब्लिंकन यांनी म्हटले आहे.

भारताच्या कामगिरीचं केलं कौतुक –
ब्लिंकन यांनी मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली भारताने केलेल्या कामगिरीची प्रशंसा केली आणि भारताच्या यशाची ही एक विलक्षण यशोगाथा असल्याचे म्हटले आहे. भारताच्या आर्थिक विकासाचा उल्लेख करताना ते म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मिळवलेले हे विलक्षण यश आपण पाहत आहोत.’ एवढेच नाही तर, भारत-अमेरिका संबंधांना नव्या उंचीवर नेण्याच्या दृष्टीने दोन्ही देशांचे राष्ट्रप्रमुख समर्पित होऊन काम करत आहेत, असेही ब्लिंकन यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here