पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सोलापूर दाैरा; जाणून घ्या कोणते रस्ते बंद? पर्यायी मार्ग काय?

0
48

 सोलापूर: पंतप्रधाननरेंद्र मोदी हे शुक्रवार १९ जानेवारी २०२४ रोजी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मोदी हे रे नगर कुंभारी येथील पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत असंघटीत कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुल योजनेचा लोकार्पण सोहळा करणार आहेत.

त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिने कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता सोलापूर ते हैद्राबाद रोडवरील दोड़डी फाटा ते कुंभारी जाणारा रस्ता राज्यमार्ग क्रमांक २०५ हा शुक्रवारी दिवसभर अत्यावश्यक सेवेची वाहने वगळून इतर वाहनांच्या वाहतूकीसाठी बंद करण्याचा निर्णय सोलापूर पोलिस दलाच्या वाहतूक शाखेने घेतला आहे. दरम्यान, वाहतूक बंद केल्याने पोलिसांनी पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिला आहे.

याबाबत पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी आदेश पारित केला आहे. दरम्यान, पंतप्रधान यांचा दौरा होणार असल्याने दोडडी फाटा – दोडडी चौक- रे नगर- कुंभारी या दरम्यान पथक्रमण करण्यास मनाई करण्यात येत आहे. तर कुंभारी – रे नगर – दोडडी चौक, दोडडी फाटा या दरम्यान पथक्रमण करण्यास मनाई करण्यात येत आहे. या मार्गावरील वाहने तांदुळवाडी – मुस्ती – धोत्री, वडगाव, दिंडूर, वळसंग या मार्गे पथक्रमण करतील. शिवाय वळसंग – दिंडूर – वडगाव धोत्री मुस्ती तांदुळवाडी या मार्गे पथक्रमण करतील. हा आदेश पोलीस, रूग्णसेवा, अग्निशमन दलाची वाहने, अत्यावश्यक सेवेतील वाहने व परवानगी दिलेल्या वाहनांना लागू राहणार नाही असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

असे जाता येईल कार्यक्रमस्थळी

या मार्गे जाता येणार कार्यक्रमास सोलापूर ते अक्कलकोट रोडवरील बंदपट्टे विटभट्टी ते रे नगर रस्ता, आण्णा मोटार्स ते रे नगर जाणारा रस्ता, टोल नाका ते रे नगर जाणारा रस्ता या ठिकाणाहून वाहन पार्किंग ठिकाणी नागरिकांना पोहचता येणार आहे. शिवाय सोलापूर हैद्राबाद रोडवरील मुळेगांव, दोड्डी फाटा, दोड्डी चौक, धोत्रीमार्गे वाहने पार्किंग ठिकाणी पार्किंग करून सभास्थळी पोहोचता येणार आहे. त्याचप्रमाणे व्हीव्हीआयपीच्या सुरक्षेच्या कारणास्तव दोड्डी फाटा ते कुंभारी रस्ता १९ जानेवारी रोजी बंद ठेवण्यात येणार आहे. कुंभारी ते दोड्डी फाटा रस्ता प्राथमिक आरोग्य केंद्रापासून पुढे सर्व नागरिकांसाठी बंद करण्यात येणार आहे अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here