पाथर्डी अहमदनगर रोडवरील भिंगार शहरातून पदयात्रा पुढे मार्गस्थ झाली आहे. ही पदयात्रा नगर शहरातील जीपीओ चौक, चांदनी, चौक, माळीवाडा चौक, स्वस्तिक चौक मार्गे केडगावला जाणार आहे.केडगाव येथून सुप्याकडे या पदयात्रचे प्रस्थान होईल.
तिथे दुपारच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यानंतर ही पदयात्रा दुपारी तीन नंतर पदयात्रा पुणे जिल्ह्याकडे प्रस्थान होईल.
जरांगे पाटील यांच्या पदयात्रेमध्ये समोर डीजे लावलेला असून त्यावर आज श्रीरामांची गाणी ही लावण्यात आलेली आहेत. तसेच पोवाडेही लावण्यात आलेले आहेत. भगवे झेंडे घेऊन आणि ताल धरत तरुणांचा मोठा सहभाग यामध्ये आहे. जरांगे पाटील यांच्यासोबत हजारो तरुण आणि पाठीमागे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत.
बारारबाभळी येथील मदरशामध्ये मनोज जारांगे पाटील यांनी रात्री मुक्काम केला. त्यानंतर रात्री दोन वाजता तिथे त्यांची सभा झाली आणि तिथेच त्यांनी मुक्काम केला. मदरशामधील विद्यार्थ्यांसमवेत त्यांनी जेवण केले.