कोल्हापूर परिक्षेत्रातील २८ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकारी स्वजिल्ह्यातून बाहेर

0
58

कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वत:च्या जिल्ह्यात कार्यरत असणारे आणि कार्यकाल पूर्ण झालेल्या २८ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या. विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सोमवारी (दि.

२२) रात्री बदल्यांचा आदेश जारी केला. बदली झालेल्या अधिका-यांना तातडीने बदलीच्या ठिकाणी हजर राहण्याचे आदेश फुलारी यांनी दिले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात कार्यरत असलेल्या पोलिस निरीक्षकांच्या पुढीलप्रमाणे बदल्या झाल्या. (कंसात बदलीचे ठिकाण) संदीप कोळेकर (सांगली), राजेश सावंत्रे (सातारा), अविनाश कवठेकर (सातारा), भैरू तळेकर (सांगली), राजेंद्र मस्के (सातारा), प्रकाश गायकवाड (सांगली), ईश्वर ओमासे (सांगली), अरविंद काळे (सातारा), संतोष घोळवे (पुणे ग्रामीण) अशा बदल्या झाल्या.

सांगली जिल्ह्यात कार्यरत असणारे निरीक्षक शिवाजी गायकवाड (कोल्हापूर), नारायण देशमुख (पुणे ग्रामीण), जितेंद्र शहाणे (सातारा) यांची बदली झाली.

सातारा जिल्ह्यातील निरीक्षक संदीप भागवत (सांगली), नवनाथ मदने (पुणे ग्रामीण), निंगाप्पा चौखंडे (कोल्हापूर), महेश इंगळे (कोल्हापूर) यांची बदली झाली.

पुणे ग्रामीणमधील निरीक्षक विलास भोसले (कोल्हापूर), यशवंत नलवडे (सातारा), संजय जगताप (सोलापूर ग्रामीण), सचिन पाटील (कोल्हापूर), महेश ढवाण (सांगली), नारायण पवार (सोलापूर ग्रामीण), दिलीप पवार (कोल्हापूर) यांची बदली झाली.

सोलापूर ग्रामीणमध्ये कार्यरत असलेले विनय बहीर (सांगली), दीपरतन गायकवाड (पुणे ग्रामीण), गोरख गायकवाड ( पुणे ग्रामीण), अशोक सायकर (कोल्हापूर) आणि अरुण फुगे (पुणे ग्रामीण) यांची बदली झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here