दारुपेक्षाही आरोग्यासाठी घातक आहेत 4 पदार्थ, सेवन जास्त झाल्यास होऊ शकतो मृत्यू

0
63

तुम्ही नेहमी ऐकलं असेल की दारू, धुम्रपान सारख्या गोष्टींचे सेवन टाळावे कारण यामुळे आरोग्याला गंभीर हानी पोहोचते. पण दारू आणि धूम्रपान यांच्यापेक्षाही असे काही पदार्थ आहेत ज्याने आरोग्याला हानी पोहोचू शकते आणि काहींचे अतिसेवन केल्यास मृत्यूचा धोका देखील असतो.

दैनंदिन जीवनात आपण अनेक अशा पदार्थांचे सेवन करतो जे पदार्थ शरीराला आतून पोखरतात, तेव्हा अशा पदार्थांचे सेवन कमी करणे फायदेशीर ठरते.

सोडियम : सोडियम म्हणजेच मीठ हे पदार्थाला चव देण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे, परंतु त्याचे जास्त सेवन केल्यास हाय ब्लड प्रेशरची समस्या होऊन हृदयरोगाचा धोका देखील उद्भवू शकतो. लिव्हरसाठी देखील सोडियमचे जास्त प्रमाणात केलेले सेवन नुकसानदायक ठरू शकते. तसेच मिठाचे शरीरातील प्रमाण जास्त झाले तर हाड ठिसूळ होण्याची भीती असते. त्यामुळे सोडियम म्हणजेच मिठाचे सेवन मर्यादित प्रमाणातच करायला हवे.

ऍडेड शुगर : बाजारात असे अनेक खाण्याचे पदार्थ उपलब्ध असतात ज्यांच्यामध्ये ऍडेड शुगर म्हणजेच अतिरिक्त साखर असते. ऍडेड शुगरमुळे वजन वाढणे आणि फॅटी लिव्हरची समस्या उद्भवू शकते. केक, बिस्कीट, फ्रुट ज्यूस, कोल्ड्रींक, इत्यादी पदार्थांमध्ये ऍडेड शुगर असते तेव्हा अशा पदार्थांचे सेवन टाळायला हवे.

प्रोसेस्ड मीट : बाजारात अनेक प्रकारचे प्रोसेस्ड मीट उपलब्ध असून अनेकजण दैनंदिन जीवनात त्याचे सेवन करतात. परंतु अशा प्रोसेस्ड मीटमध्ये सोडियम आणि नायट्रेटचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे शरीराला नुकसान पोहोचू शकते. तेव्हा प्रोसेस्ड मीटचे जास्त सेवन केल्यास अनेक गंभीर आजारांना आमंत्रण मिळू शकते.

सॉफ्ट ड्रिंक्स : सध्या विविध प्रकारचे सॉफ्ट ड्रिंक्स बाजारात उपलब्ध असून काहीजण दिवसातून अनेकदा त्याचे सेवन करत असतात. परंतु या सॉफ्ट ड्रिंक्समध्ये ऍडेड शुगर असते जी नैसर्गिक फळांच्या ज्यूसमध्ये नसते. तेव्हा सॉफ्ट ड्रिंक्स पिण्याऐवजी ताज्या फळांचा ज्यूस बनवून पिणे आरोग्यासाठी चांगले ठरेल.

(सदर माहिती ही इंटरनेटवरून मिळालेल्या मजकुरावर आधारित आहे. त्यामुळे आहारात कोणताही बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here