खोची येथील श्री भैरवनाथ आजी माजी सैनिक वेलफेअर असोसिएशनच्या वतीने राबविले जाणारे उपक्रम निश्चितच स्तुत्य व प्रेरणादायी आहेत.
विद्यार्थ्यांनी ज्ञान व शिक्षणाबरोबरच आपल्यातील विविध कलागुण विकसित करुन आपले करिअर घडवावे,असे प्रतिपादन माजी मुख्याध्यापक डी.एस.पाटील यांनी केले.
खोची येथील श्री भैरवनाथ आजी माजी सैनिक वेलफेअर असोसिएशनच्या वतीने आयोजित वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते.माजी सैनिक के.ए.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आनंदराव भाऊसो पाटील सभागृहात कार्यक्रम पार पडला.
असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी खोत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.ॲड.दीपक कृष्णराव पाटील,वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक डी.एस.पाटील व डी.जी.शेख यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
वक्तृत्व कला व सूत्रसंचालन बाबत श्री.पाटील व श्री.शेख यांनी विद्यार्थ्यांना उपयुक्त मार्गदर्शन केले.यावेळी बाळासो पाटील,भगवान रा.पाटील,सचिव आशिष गुरव,धनाजी गुरव,भरत बाबर,शिवाजी कुरणे,अजित देसावळे,अन्य सदस्य,ग्रामस्थ,विद्यार्थी उपस्थित होते.
वक्तृत्व स्पर्धेत कै.प्र.ल.चौगुले हायस्कूल खोची व खोची हायस्कूल खोची मधील तीस विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेसाठी माणिक ढाले,मोहन रा.पाटील,कृष्णात बामणे,दिनकर र.पाटील,धनाजी गुरव,भानुदास वाघ,वसंत कृषी सेवा केंद्र खोची यांनी बक्षीसासाठी रोख रक्कम दिली होती.शिवाजी शामराव सुर्यवंशी यांनी आई वडिलांच्या स्मरणार्थ सन्मानचिन्हे पुरस्कृत केली होती.
स्पर्धेचा निकाल —लहान गट — प्रथम स्वराली अमोल परीट,द्वितीय श्रावणी विकी आयवळे, तृतीय स्नेहल दत्तात्रय परीट,उत्तेजनार्थ अनुष्का संतोष बाबर व ईफत रियाज पाथरवट.
मोठा गट — प्रथम यशविरा शाम सर्जे, द्वितीय सानिका सुभाष शेवाळे,तृतीय कशिश अल्लाबक्ष पाथरवट,उत्तेजनार्थ हंसिका शहाजी पाटील व संबोधी रणजित कुरणे.