विश्वविक्रमी झंकार ऑर्केस्ट्रा सुतार बंधूंचा -खासदार धनंजय महाडिक यांचे हस्ते सन्मान

0
201

कोल्हापूर या कलानगरी मध्ये सांस्कृतिक क्षेत्रात गेली अनेक वर्षे आपल्या कर्तृत्वाने झळकणारे नाव म्हणजे सुतार बंधू प्रेझेंट्स ऑर्केस्ट्रा झंकार बिट्स
एकाच कुटुंबातील हे संगीत क्षेत्रातील 6 बंधू 31 जुलै 1981 ते 31जुलै 2023 या 44 वर्षात सलग , अथक याच तारखेला स्व महंमद रफी यांच्या पुण्यतिथी निमित्त रफी की यादे हा कार्यक्रम सादर करत आले आहेत .

गायक इब्राहिम खोजी व ऑर्केस्ट्रा झंकार बिट्स यांनी हा उपक्रम गेली 44 वर्षे अव्याहत सुरू ठेवला आहे . याची दखल घेऊन या उपक्रमाची नोंद यावर्षी जागतिक पातळीवर झाली आहे .
एशिया पॅसिफिक बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यामध्ये या उपक्रमाला विश्वविक्रम प्राप्त झाला आहे . याबद्दल या सर्व कलाकारांचा सन्मान सोहळा दि 21 ऑगस्ट रोजी शाहू स्मारक भवन येथे पार पडला


यासाठी प्रमुख अतिथी म्हणून मा खासदार धनंजय महाडिक यांनी आपल्या मनोगतात ” सुतार बंधू नी कोल्हापूर च्या संगीतिक परंपरेत या विश्वविक्रम च्या निमित्ताने अभिमानास्पद कामगिरी केली आहे . आता एवढ्यावर न थांबता आधुनिक तंत्रज्ञान च्या मदतीने नवीन माध्यमातून सर्व जगभर पोचण्याचे उद्दिष्ट बाळगावे .. एकत्रित असलेले हे सुतार बंधू व त्यांचे हे कलाप्रेम , त्यांचा खडतर प्रवास आणि आज जगभर पोहचलेले त्यांचे नाव हे निश्चित च कोल्हापूर साठी भूषणावह आहे
असे उद्गार काढले .

त्यांच्या हस्ते रवी , गोविंद , प्रकाश , मुकुंद , झंकार व मेघराज आणि गायक इब्राहिम खोजी, शुभम , विशाल , स्वप्नील यांना वर्ल्ड रेकॉर्ड सर्टिफिकेट व मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले .
या कार्यक्रमासाठी समन्वयक सागर बगाडे (सार्थक क्रियेशन्स) , वर्ल्ड रेकॉर्ड ऑब्झर्व्हर डॉ महेश कदम यांचेसह उद्योग पती गिरीश शहा , देवेंद्र दिवाण , महेश पन्हाळकर , प्रसाद जमदग्नी , सुनील व रोहन घोरपडे , दिनेश माळी , रजनी गोरड
, कोल्हापूर डान्स असोशियन चे पदाधिकारी , कलापथक निर्माता संघाचे पदाधिकारी व सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते . सूत्रसंचालन प्रल्हाद पाटील यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here