कोल्हापूर:(प्रतिनिधी )प्रियांका शिर्के-पाटील
कोल्हापूर महापालिकेतील आयुक्त पद दोन जून पासून रिक्त होते यावरून मोठा राजकीय वाद पेटला होता त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर दौऱ्यावर 15 ऑगस्ट 2023 रोजी आले होते त्यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेला तातडीने पूर्ण वेळ आयुक्त मिळावेत अशी मागणी वेगवेगळ्या संघटनाकडून केली होती. अखेर कोल्हापूर महानगरपालिका आयुक्तपदी के मंजू लक्ष्मी यांची नियुक्ती झाली आहे उद्या दिनांक 23 ऑगस्ट 2023 रोजी आपल्या पदाचा कार्यभाग स्वीकारतील.
गेल्या अनेक महिन्यापासून रिक्त असलेल्या कोल्हापूर महापालिकेला अखेर आयुक्त मिळाले. सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्ती पदी नियुक्ती झाली आहे.
त्या उद्या बुधवारी (दि.२३) आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. राज्य शासनाने आज, मंगळवारी याबाबत आदेश काढले.
कादंबरी बलकवडे यांची बदली होऊन जवळजवळ दोन महिने उलटले तरी आयुक्त पदी नियुक्ती झालेली नव्हती. यावरुन कोल्हापुरात राजकीय वाद पेटला होता. एका संघटनेने तर थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना याप्रश्नी साकडे घातले होते. तर स्वातंत्र्यदिनी आपल्या भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आठवड्याभरात कोल्हापूरला आयुक्त देण्याचे आश्वासन दिले होते.
प्रभारी प्रशासक म्हणून जिल्हाधिकारी राहुल रेखावारांकडे प्रभार होता. मात्र, त्यांना धोरणात्मक निर्णय घेण्यात अडचणी निर्माण होत होत्या. शहरातील रस्त्यांची झालेली दुरावस्था, पाणीपुरवठा, थेट पाईपलाईन प्रश्न, आगामी मनपा निवडणूक यासह अनेक धोरणात्मक निर्णय घेणे अडचणीचे बनले होते. अखेर आयुक्तपदी के. मंजुलक्ष्मी यांची नियुक्ती झाल्याने कोल्हापूरकरांचे प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे.