पत्रकाराला धक्काबुक्की करणाऱ्या संबंधित पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करावी व त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी आज कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने निदर्शने

0
90

कोल्हापूर येथे प्रेस क्लबच्या वतीने निदर्शने….✍️

पुणे येथे आंदोलनाचे वार्तांकन करण्यास गेलेल्या पुढारी वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला धक्काबुक्की करणाऱ्या संबंधित पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करावी व त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी आज कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने कोल्हापूरात दसरा चौकतील छत्रपती शाहू महाराज पुतळ्याजवळ निदर्शने करण्यात आली. यावेळी पत्रकाराला धक्काबुक्की करणाऱ्या त्या पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवण्यात आला.

याबाबतची अधिक माहिती अशी की, शुक्रवारी पुणे येथे पुढारी वृत्तवाहिनेचे पत्रकार ज्ञानेश्वर चौतमल व कॅमेरामन निखिल करंदीकर एका आंदोलनाचे वार्तांकन करण्यासाठी गेले होते. यावेळी याठिकाणी बंदोबस्तावर असलेले पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. शिवाय दमदाटी करत संबंधित पोलिसांकडून कॅमेरा, बुम माईकचीही तोडफोड करण्यात आली. या घटनेने पत्रकारांमध्ये संतापाची लाट पसरली असून संबंधित पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा निषेध नोंदवत कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने दसरा चौकात निदर्शने करण्यात आली.
संबंधित पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची तात्काळ चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी पत्रकाराच्या वतीने करण्यात आली. यावेळी कारवाईच्या मागणीचे निवेदन छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याच्या पायथ्याशी ठेवण्यात आले.
प्रेस क्लब येथे झालेल्या पत्रकारांच्या बैठकीत संबंधित पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करावी असा ठराव करण्यात आला. याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्याचे ठरवण्यात आले.
यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष शितल धनवडे, उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर, कार्याध्यक्ष दिलीप भिसे, सचिव बाबुराव राणगे, भूषण पाटील यांनी मनोगत व्यक्त करत निषेध नोंदविला.

याप्रसंगी सतेज औंधकर, रणजीत माजगावकर, दयानंद लीपारे, विश्वास पानारी, अमरसिंह पाटील, प्रशांत चुयेकर, नयन यादवाड, जावेद तांबोळी, सागर यादव, प्रवीण मस्के.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here