प्रतिनिधी : अभिनंदन पुरीबुवा
सातारा : साताऱ्या मधील कोयना धरणाच्या परिसरात भुकंप झाल्याची बातमी समोर आली आहे. साताऱ्यातील कोयना धरण परिसरात भूकंपाचा धक्का जाणवला आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून पश्चिमेस ६ किलोमीटर अंतरावर होता. या भूकंपाने कोयना धरणाला कोणताही धोका नसल्याचेही धरण व्यवस्थापनाने दिला आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, रविवारी २८, जानेवारी कोयना धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता ३.१ रिश्टर इतकी होती, तर केंद्रबिंदू कोयना धरणापासून पश्चिमेस ६ किलोमीटर अंतरावर होता. या भूकंपाचा कोयना धरणाला कोणताही धोका नसल्याचे स्पष्टिकरण धरण व्यवस्थापनेच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे.
दरम्यान, कोयना धरण परिसरात वारंवार भूकंपाचे धक्के जानवत असतात. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाण्याचे आवाहनही धरण व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी केले आहे.पृथ्वीचा वरचा पृष्ठभाग सात टेक्टोनिक प्लेट्सपासून बनलेला आहे. या प्लेट्स जिथे एकमेकांवर आदळतात त्या भागाला भूकंपाचा धोका असतो. तसेच जेव्हा या प्लेट्स एकमेकांच्या क्षेत्रात जाण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा भूकंपाचा धक्का बसतो. प्लेट्स एकमेकांवर घासतात, त्यातून प्रचंड ऊर्जा बाहेर पडते आणि त्या घर्षणामुळे पृथ्वीचा वरचा भाग हादरु लागतो.