कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आलेल्या दोन महिला भाविकांच्या पर्स चोरट्यांनी लंपास केल्या.

0
82

कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आलेल्या दोन महिला भाविकांच्या पर्स चोरट्यांनी लंपास केल्या. हा प्रकार रविवारी (दि. २८) सायंकाळी आणि रात्री घडला. याबाबत जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दोन फिर्यादी दाखल झाल्या असून, मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजवरून चोरट्यांचा शोध सुरू आहे.

अंबाबाई मंदिरात दर्शन घेणा-या भाविकांच्या पर्स, दागिने, पाकिटे लंपास करणारे काही चोरटे सक्रीय होते. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे कर्मचारी आणि साध्या वेशातील पोलिसांनी संशयितांवर नजर ठेवून कारवाया केल्यानंतर हे प्रकार कमी झाले होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून चोरटे पुन्हा सक्रीय झाल्याचे दिसत आहे.

रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास सुनीता सुखदेव ताटे (वय ३८, रा. चाकण, ता. खेड, जि. पुणे) या कासव चौकातून मुखदर्शन घेत असता, त्यांची पर्स चोरट्याने लंपास केली. महिला बचत गटाकडून जमा झालेले ३५ हजार रुपये ताटे यांनी पर्समध्ये ठेवले होते. दुस-या घटनेत स्नेहल संजय पाटील (वय ५९, रा. लॉ कॉलेज रोड, पुणे) या कासव चौकातून दर्शन घेताना त्यांच्या पर्सची चोरी झाली. पर्समध्ये पाच ग्रॅमच्या सोन्याच्या कुड्या आणि ७ हजार ५०० रुपयांची रोकड होती. दोन्ही महिलांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here