टाटाची वीज महागणार; वीज ग्राहकांना शॉक बसणार

0
53

महावितरण, बेस्ट, अदानी इलेक्ट्रिसिटी आणि टाटा पॉवर या वीज कंपन्यांच्या बहुवार्षिक वीज दरवाढीला महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने मंजुरी दिली असतानाच आता टाटा पॉवरने येत्या आर्थिक वर्षासाठी आयोगाकडे वीज दरवाढीचा प्रस्ताव दाखल केला आहे.

या प्रस्तावानुसार, घरगुती वीज दरात मोठी वाढ होणार असून, १०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना वीज दरवाढीची मोठी झळ बसणार आहे.

बहुवार्षिक वीज दरवाढीच्या प्रस्तावावर वीज दरवाढीला मंजुरी देतानाच आयोगाने दरम्यानच्या वर्षासाठी प्रस्ताव दाखल करण्यासाठीचा पर्याय दिला होता. त्यानुसार, चार वीज कंपन्यांपैकी आता केवळ टाटा पॉवरनेच वीज दरवाढीचा प्रस्ताव दाखल केला आहे.

घरगुती दर :

(०-१०० युनिट आणि १०१-३०० युनिट स्लॅब) खूपच कमी होते. निवासी स्लॅबच्या स्पेक्ट्रममध्ये ५-६ रुपये प्रतियुनिट फरक होता. हे तर्कसंगत करण्यासाठी, या दोन स्लॅबमध्ये वाढ सुचवली आहे. म्हणजे ०-१०० स्लॅबमध्ये १३ टक्के वाढ आणि १००-३०० युनिट स्लॅबमध्ये ३ टक्के वाढ आहे. त्यानंतर ३००-५०० युनिट्स आणि ५०० वरील युनिट स्लॅबमध्ये अनुक्रमे १७ टक्के आणि २० टक्के कपात प्रस्तावित आहे.- टाटा पॉवर

टाटाचे प्रस्तावित दर :

युनिट २०२३-२४ २०२४-२५ वाढ %
घरगुती (बीपीएल) १ ८९ ८९
०-१०० १.६५ ४.९६ २०१
१०१-३०० ४ .२० ६.९७ ६६
३०१-५०० ७.६५ ८.४० १०
५०० वर ८.३५ ७.९४ ५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here