कोल्हापुरातील शाळांमध्ये दाखवणार चंद्रयान ३ लॅंडिंगचे प्रक्षेपण

0
95

कोल्हापूर : जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये बुधवारी संध्याकाळी होणाऱ्या चंद्रयान ३ लॅडिंगचे प्रक्षेपण विद्यार्थ्यांना दाखवण्यात येणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांच्या सुचनेनुसार प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी याबाबत सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवून नियोजनाच्या सुचना दिल्या आहेत.

भारताच्या चंद्रयान मोहिम तीन अंतर्गत लॅंडर बुधवारी संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्रावर उतरवण्यात येणार आहे. याआधीच्या दोन तासाची चंद्रवरील स्थिती पाहून याबाबतचा निर्णय ‘इस्त्रो’ घेणार आहे. डी.डी. नॅशनल आणि इस्त्रोच्या साईटवरून ही प्रक्रिया सायंकाळी ५ वाजून २७ मिनिटांनंतर हे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. हे प्रक्षेपण पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना प्राेत्साहित करावे असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. या लॅडिंगबाबत नागरिकांमध्येही कमालीची उत्सुकता दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here