कच्चे बदाम खाणं जास्त फायदेशीर असतं की भिजवून? जाणून घ्या फायदे..

0
75

Raw almond vs soaked almond: बदाम खाणं आरोग्यासाठी किती फायदेशीर असतं हे तुम्हाला माहीत आहेच. कोणत्याही ऋतूमध्ये बदाम खाता येतात. पण काही लोकांना कच्चे बदाम पचवणं थोडं अवघड होत. ज्यामुळे सूज, गॅस आणि पोटाची समस्या होऊ शकते.

बऱ्याचदा लोक कन्फ्यूज असतात की, बदाम कच्चेच खावेत की भिजवून? चला जाणून घेऊ याचं उत्तर…

बदाम भिजवून खाणं जास्त फायदेशीर

बदाम रात्रभर किंवा काही तासांसाठी पाण्यात भिजवून ठेवा. याने साल काढणंही सोपं होतं. तसेच बदाम भिजवून खाल्ले तर त्यातील पोषक तत्व मिळतात. तसेच भिजवलेले बदाम पचवणं सुद्धा सोपं होतं. कच्चे बदाम खाल तर पचन तंत्रासाठी समस्या होऊ शकते. त्यामुळे भिजवलेलेच बदाम खाणं चांगलं ठरतं. चला जाणून घेऊ भिजवलेल्या बदामाचे फायदे…

1) हृदयाचं कार्य सुधारतं

जर्नल ऑफ न्युट्रीशनच्या अहवालानुसार, बदामातील अँटीऑक्सिडंट शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. यामुळे हृद्यावरील ताण कमी होण्यास मदत होते तसेच हृदयविकारांपासूनही बचाव होतो. त्यामुळे आहारात बदामांचा समावेश अवश्य करावा.

2) बॅड कोलेस्ट्रेरॉल’दूर करतात

आजकाल तणावग्रस्त जीवनशैली तसेच वेळी अवेळी खाल्ल्याने शरीरात कोलेस्ट्रॉल वाढण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस वाढल्याने हृदयविकार जडण्याची समस्या बळावत आहे. बदामांमुळे शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी होऊन ‘गुड’ कोलेस्ट्रॉल वाढतं.

3) पचनशक्ती सुधारते

‘जर्नल ऑफ फूड सायन्स’मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अभ्यासानुसार कच्चे व भिजवलेले बदाम पाण्यात भिजवल्याने पचन सुधारते. कारण भिजवलेल्या बदामाच्या सालींमध्ये असणारी एन्जाईम्स शरीरातील मेद कमी करण्यास मदत होते. परिणामी पचनशक्ती सुधारते.

4) ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवतात

ब्लड प्रेशर म्हणजे रक्तदाबाची समस्या नियंत्रणात ठेवण्यासाठी बदाम फारच फायदेशीर आहे. ‘जर्नल ऑफ फ्री रॅडीकल रिसर्च’ यांच्यानुसार बदामातील ‘अल्फा टेकोफेरॉल्स’ रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी बदाम खाल्ल्यास यामुळे नैसर्गिकरित्या रक्तदाब प्रमाणात राहण्यास मदत होते. असे देखील या संशोधनातून पुढे आले आहे. विशेषतः 30 -70 वयोगटातील पुरूषांमध्ये हा फरक प्रामुख्याने आढळून आला.

5) वजन घटवण्यास मदत

‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ ओबेसिटी रिलेटेड मेटॅबोलिक डिसऑर्डर’ यांच्या अहवालानुसार बदामात कॅलरी कमी असल्याने त्याचा आहारात समावेश करावा. बदामामुळे पचन सुधारते, वारंवार लागणार्‍या भूकेवर नियंत्रण मिळते तसेच लठ्ठपणा वाढण्याचे प्रमुख कारण असलेल्या मेटॅबॉलिक सिंड्रोमवरही नियंत्रण मिळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here