ऑफर आणली आहे. त्यामुळे पेट्रोल स्कूटरच्या भावात त्यांना ई-स्कूटर खरेदी करण्याची संधी मिळाली आहे. केंद्र सरकारने फेम-2 सबसिडी कमी केली होती. त्यामुळे ई-स्कूटरच्या किंमती भडकतील असा दावा करण्यात येत होता.
सबसिडी कमी करुन पण ई-स्कूटर कंपन्यांच्या किंमतीत सातत्याने कपात होत आहे. आता बाजारात उपलब्ध चांगल्या रेंजची ई-स्कूटरच्या किंमती स्वस्त झाल्या आहेत.
ओलाचा भाव इतका झाला कमी
सबसिडी कमी झाली तरी ई-स्कूटरचा भाव कमी झाला आहे. ओला इलेक्ट्रिक स्कूटरची सुरुवातीची किंमत 79,999 रुपये आहे. ओला एस1 एक्सचे बेसिक व्हेरिएंट पण याच किंमतीला मिळणार आहे. ओलाने S1X चे एक 4kWh बॅटरी असणारे व्हेरिएंट 109,999 रुपयांना तर 110 सीसी इंजिन पेट्रोल स्कूटरची किंमत 80 हजार ते 1 लाख रुपयांदरम्यान आहे.
एथरने केली किंमत कमी
इलेक्ट्रिक दुचाकी कंपनी एथर एनर्जी पण या स्पर्धेत उतरली आहे. ही देशातील इलेक्ट्रिक दुचाकी कंपन्यांमध्ये ही लोकप्रिय आहे. ओला कंपनीने किंमत कपातीचे धोरण जाहीर करताच एथर कंपनीने पण ई-स्कूटरच्या किंमती कमी करण्याची घोषणा केली आहे. दिल्लीत या स्कूटरची किंमत राज्यातील सबसिडीनंतर एक लाख रुपयांपेक्षा कमी झाली आहे.
कंपन्यांचे धोरण तरी काय
इलेक्ट्रिक स्कूटर तयार करणाऱ्या कंपन्यांमध्ये सध्याच्या मॉडल्सच्या किंमती कमी करण्यासाठी चढाओढ लागली आहे. कंपन्या नवीन किफायतशीर व्हेरिएंट्स घेऊन येत आहे. बजाजची इलेक्ट्रिक स्कूटर चेतकच्या किंमतीत पण घसरण झाली आहे. काही राज्यात ही स्कूटर अवघ्या 1.15 लाख रुपये आहे. पूर्वी ही स्कूटर दीड लाख रुपयांना मिळत होती. हिरो मोटोकॉर्पने पण इलेक्ट्रिक स्कूटर विदाच्या किंमतीत कपात केली आहे.