कै.ए.डी.शिंदे यांच्या स्मृतिदिनानिमित्त सायबर ट्रस्ट संचलित महिला महाविद्यालय येथे वार्षिक प्रदर्शनाचे उद्घाटन

0
112

सायबर महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष कै.ए.डी.शिंदे यांच्या 14 व्या पुण्यस्मरणानिमित्य सकाळच्या पहिल्या सत्रात मान्यवरांच्या उपस्थितीत स्मृतिशिल्पास पुष्पांजली अर्पण करण्यात आली.

याप्रसंगी जेष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार,सौ.सुधाताई पवार,सौ.वैशाली शिंदे, डॉ.विजयसिंह शिंदे, डॉ. प्रकाश शिंदे,श्री.निरंजन निंबाळकर,श्री. सुनील शिंदे, सायबर ट्रस्टचे सचिव व व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. आर. ए. शिंदे, सी. ए. ऋषिकेश शिंदे , डॉ. पी डी साबळे, डॉ.व्ही.एम.हिलगे, डॉ. तुकाराम शिवारे, डॉ. विद्या उपाध्ये ई. मान्यवर उपस्थित होते.

दुसऱ्या सत्रात मान्यवरांच्या हस्ते आनंद ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये सुमारे 25 हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रकाशकांनी आपली विविध विषयांवरील पुस्तके सवलतीच्या दरात विक्रीसाठी ठेवली आहेत.कार्यक्रमाच्या तिसऱ्या सत्रात महिला महाविद्यालयाचे वार्षिक प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ.विजयसिंह शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.


फूड टेक्नॉलॉजी विभागातील विद्यार्थिनींनी अनेक नावीन्यपूर्ण व पौष्टिक पदार्थांची मांडणी केली आहे. अनेक प्रकारची पेय, हेल्दी स्ट्रीट फूड, परंपरा जोपासणारे ट्रॅडिशनल फुड्स प्रदर्शनात ठेवण्यात आलेले आहेत.

शेवटच्या वर्षातील बी.एस.सी फूड टेक्नॉलॉजी व एम. एस. सी. फूड सायन्स अँड न्यूट्रिशन च्या विद्यार्थ्यांनीनी त्यांच्या रिसर्च प्रोजेक्टची मांडणी केलेली आहे.
फॅशन डिझाइनिंग या विभागातील प्रथम वर्षातील विद्यार्थिनींनी त्यांचे शैक्षणिक काम तसेच द्वितीय वर्षातील विद्यार्थिनींनी फेअरी इलेव्हन या चित्रांमध्ये गाऊन, वेडडींग गाऊन, डेनिम पॅचवर्क, शॉल चा वापर करून गारमेंट्स तयार केलेले आहेत तसेच तिसऱ्या वर्षातील विद्यार्थिनींनी रिसायकल गारमेंट्स तयार केलेले आहेत.


बॅचलर ऑफ इंटिरियर डिझाईन या अभ्यासक्रमातील विद्यार्थिनींनी कला, शीट्स, मॉडेल्स शोभेच्या वस्तू, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू, स्केचेस इत्यादी वर सादर केलेले आहेत प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींनी बॉलीवूड थीम द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनींनी गुहा ही थीम आणि शेवटच्या वर्षातील विद्यार्थिनींनी बायोफिलिया थीम घेऊन सादरीकरण केले आहे.


पर्यावरणशास्त्र विभाग बी.एस.सी.भाग प्रथम व दिव्तीय वर्षातील विद्यार्थिनींनी वेस्ट मटेरियल पासून विविध वस्तू बनवल्या आहेत. विशेषतः सुकलेल्या फुलांपासून धूप, नारळाच्या करवंटी पासून झाडे लावण्यासाठी कुंडी, मातीचे दागिने आणि इको फ्रेंडली पेन अश्या वस्तूंची निर्मिती विद्यार्थिनींनी केली आहे. या प्रदर्शांत पर्यावरण संवर्धन आणि कचरा व्यवस्थापन या मुद्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.


वाणिज्य विभागातर्फे कोल्हापूर शहरातील उत्पन्नाचे स्रोत या विषयावरील जिल्हातील प्राथमिक, माध्यमिक व प्रादेशिक क्षेत्राचे मॉडेल जसे साखर उद्योग, एम.आय.डी.सी, महालक्ष्मी मंदिर, रंकाळा तलाव इत्यादी मॉडेलस, त्यांचे चार्ट, डिस्प्ले, सेल्फी पॉइंट, फीडबॅक पॉइंट, आणि कोल्हापुरी कट्टा देखील तयार केला आहे.


फॉरेन लांग्वेज प्रदर्शनास डॉ मेघा पानसरे, फॉरेन लांग्वेज, शिवाजी विद्यापीठ प्रमुख पाहुणे म्हणून लाभल्या आहेत. जर्मन आणि फ्रेंच भाषेतील पोस्टर, वॉलपेपर, सेल्फी पॉइंट्स आणि विविध गेम्सचे आयोजन करण्यात आले आहे.


महिला महाविद्यालयाच्या विविध विभागांमार्फत विविध उपक्रमांचे प्रदर्शन सोमवार दि. 5/2/2024 पर्यंत सर्वांसाठी खुले असून याचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. आर. कुलकर्णी यांनी केले आहे. सायबर संस्थेचे सेक्रेटरी आणि मॅनेजिंग ट्रस्टी डॉ. आर.ए.शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

डॉ.ए. आर. कुलकर्णी

SP9 MARATHI YOUR TIME YOUR NEWS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here