छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ८९.५३ टक्क्यांवर थांबला मराठा समाजाचा सर्व्हे

0
79

जिल्ह्यात ८९.५३ टक्क्यांवर मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण थांबले आहे. २ फेब्रुवारीपर्यंत शासनाने सर्व्हेसाठी मुदतवाढ दिली होती. २३ जानेवारीपासून सर्व्हे करण्यात आला होता.

छत्रपती संभाजीनगर तालुक्यात सर्वाधिक कमी सर्व्हे झाला आहे. ३१ जानेवारीपर्यंत ४६ टक्के सर्व्हेचे काम पूर्ण झाले होते. दोन दिवसांत ४३ टक्के काम झाले आहे. सात दिवसांत ४६ टक्के आणि उर्वरित दोन दिवसांत ४३ टक्के सर्वेक्षण झाल्याचे प्रशासनाकडून समोर आलेल्या आकड्यांतून दिसते आहे.

मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा आणि खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणाला २३ जानेवारीपासून सुरुवात झाली होती. जवळपास ६ हजार प्रगणकांद्वारे सर्वेक्षण होत आहे. सर्वेक्षणाच्या सुरुवातीलाच अनेक तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले. मोबाइल ॲपमध्ये नगर पालिकांची, जिल्ह्यातील गावे येत नव्हती. गावांची नावे सारखी असल्यामुळे सर्वेक्षणात अडथळे आले. ३१ रोजी छावणी हद्दीत सर्वेक्षण सुरू केले हाेते.

तालुका ………….. लोकसंख्या……….. ……कुटुंब………….. झालेला सर्व्हे…………… टक्केवारी
छ. संभाजी नगर………. ३७०६४६………… ७४१२९ …………….. ५८५३२………….. ७८.९६
गंगापूर……… ३५८१५५ ………………. ७१६३१…………. ६७१८३………… ९३.७९
वैजापूर………… ३२००७५……….. ६४०१५………. ६१५०२………. ९६.०७
कन्नड………….. ३७७७९५………. ७५५५९……….. ७२१९९……….. ९५.५५
खुलताबाद…………… १३७२०३…………. २७४४१……….. २६५८८……….९६.८९
सिल्लोड………… ४१६२२२………… ८३२४४………… ६८५५२…………. ८२.३५
सोयगाव…………. १२५७५२………… २५१५०………… २३५९८………… ९३.८३
पैठण…………….. ३४७९७०………… ६९५९४………… ५८८६१…………. ८४.५८
फुलंब्री………………. १६७२७५………….. ३३४५५………….. ३२३१०…………… ९६.५८
एकूण………………. २६२१०९३………….. ५२४२१९…………… ४६९३२५………. ८९.५३

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here