अल्पवयीन शाळकरी मुलावर चाकुने वार, सहा अल्पवयीन मुलांवर FIR

0
85

स्कूल बॅग फाडल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन सहा जणांच्या अल्पवयीन मुलांनी एका शाळकरी मुलावर चाकुने पोटावर वार करुन गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना पिंपरी येथे घडली आहे.

याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी सहा अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.1) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास एच.ए. हायस्कुल समोरील सार्वजनिक रोडवर घडला. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत जखमी अल्पवयीन मुलाने पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) शुक्रवारी (दि.2) फिर्यादी दिली आहे. त्यानुसार सहा अल्पवयीन मुलांवर आयपीसी 307, 323, 504, 143, 147, 148, 149 नुसार गुन्हा दाखल करुन आरोपींच्या मुलांच्या पालकांना समजपत्र दिले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुलगा शाळेत परिक्षेला जात होता. त्यावेळी आरोपींनी मुलाची स्कुल बॅग ओढल्याने फाटली. याचा जाब विचारला असता आरोपींनी फिर्य़ादी याच्यासोबत वाद झाला. याचा राग मनात धरून एका अल्पयीन मुलाने फिर्यादी मुलाला जिवे मारण्याच्या उद्देशाने चाकूने पोटावर वार करुन गंभीर जखमी केले. तर इतर अल्पवयीन मुलांनी फिर्यादी मुलाला अश्लील शिवागाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पांडे करीत आहेत

Helmet Compliance In Pune | कोण म्हणतेय पुणे शहरात हेल्मेट सक्ती नाही ! गतवर्षभरात हेल्मेट परिधान न करणार्‍या 4 लाख दुचाकीस्वारांना दंड

वाद मिटवणे पडले महागात, तरुणाला लोखंडी रॉड व दगडाने मारहाण; पेरणे फाटा येथील प्रकार

Firing In Police Station | भाजप आमदाराचा शिंदे गटाच्या नेत्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार, जमिनीच्या वादातून गोळीबार (Video)

बोपदेव घाटात विद्यार्थ्यांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Pune News | मराठा समाज मागासलेपण पडताळणी सर्वेक्षण ! पुणे महापालिकेच्या हद्दीत 14 लाख 30 हजार कुटुंबांचे सर्वेक्षण

SP9 MARATHI YOUR TIME YOUR NEWS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here