नायलॉनची दोरी, गाडीत रक्त अन्..; प्रेम प्रकरणामुळे तिघांकडून मित्राची हत्या

0
120

इंटरनेटच्या जमान्यात प्रेमप्रकरणं खूप वाढली आहेत; पण ती तितक्याच लवकर मोडली जातात किंवा त्या प्रेमाचा शेवट विपरित होतो. प्रेमामुळे गुन्हा घडतो आणि कुणालातरी जीव गमवावा लागतो.

मध्य प्रदेशात असाच एक प्रकार घडला आहे. इथल्या खरगोनामध्ये प्रेम प्रकरणाशी संबंधित वादातून तीन तरुणांनी एका तरुणाची निर्घृण हत्या केली आहे. हत्या झालेला तरुण 19 वर्षांचा आहे. तीन मित्रांनी जंगलात नेऊन सुऱ्याने भोसकून त्याला ठार मारलं असून, पोलिसांना मृतदेहाजवळ रक्त, नायलॉनची पातळ दोरी अशा गोष्टी सापडल्या आहेत. ‘आज तक’ कडून या बाबतचं वृत्त देण्यात आलं आहे.

आकाश बघेल असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. तीन मित्रांनी जंगलात नेऊन धारदार सुऱ्याने भोसकून त्याची हत्या केल्याचं निष्पन्न झालं आहे. 10 फेब्रुवारीला आकाशचा मृतदेह सापडला. मारेकरी तरुणांनी हत्या करुन हा मृतदेह नाल्यात फेकला. पुरावे नष्ट करण्यासाठी कारमधील रक्ताचे डाग त्यांनी पाण्याने धुतल्याचंही पोलिसांच्या लक्षात आलं. पोलिसांनी दोन सख्ख्या भावांसह तिघांना या प्रकरणी ताब्यात घेतलं असून, तीन मोबाईल, एक कार आणि एक दुचाकीही जप्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हत्या झाल्यानंतर पोलिसांनी 48 तासांच्या आत ही कारवाई केली आहे.

प्रेम प्रकरणातील वादातून 19 वर्षांच्या गौतम नावाच्या तरुणाने आपल्या सख्ख्या भावाला आणि मित्रांना हाताशी धरुन या हत्येचा कट रचल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हा मुख्यालयापासून 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या कसरावद पोलीस स्थानकाच्या हद्दीत हा गुन्हा घडला आहे. गवला रोड परिसरातील एका नाल्यात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. मृताच्या शरीरावर रक्ताचे डाग, हातावर वार दिसून येत होते, तसेच मृतदेहाजवळ नायलॉनची दोरीही पोलिसांना सापडली. प्रथमदर्शनीच ही हत्या असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. नंतर फॉरेन्सिक अधिकारी डॉ. सुनील मकवाना आणि त्यांच्या टीमने साक्षी पुराव्यांच्या मदतीने गुन्ह्याची उकल केली.

पोलिसांनी सोशल मीडियावर मृताचा फोटो व्हायरल करुन तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींची मदत घेऊन मृतदेहाची ओळख पटवली. आकाश बघेल या तरुणाचे वडील भंवरसिंह बघेल यांना आकाशच्या मृत्यूबाबत माहिती देण्यात आली. पोलीस तपासात 19 वर्षाांच्या गौतम पूनमचंद जायसवाल या तरुणाने हेमेंद्र गणेश चौहान या मित्राला हाताशी धरुन आकाशचा बदला घेतल्याचं स्पष्ट झालं. गौतमने आपला भाऊ वासू याचीही या प्रकरणात मदत घेतली. आकाशचा जीव घेतल्यानंतर गौतम आणि वासू यांनी कारमधील रक्ताचे डाग नष्ट केले. पोलिसांनी कलम 201, 120 ह आणि 34 खाली गुन्हा दाखल केला आहे.

अतिरिक्त एसपी मनोहर सिंह बारिया म्हणाले की 10 फेब्रुवारीला एक मृतदेह नाल्याच्या परिसरात सापडला. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. सोशल मीडियाच्या मदतीने मृतदेहाची ओळख पटवण्यात आली. फॉरेन्सिक टीमच्या मदतीने तीन आरोपींवर ताब्यात घेण्यात आलं. वैर भावनेतून हा खून करण्यात आला असून गौतम, हेमेंद्र आणि वासू यांना ताब्यात घेण्यात आल्याचं बारिया यांनी स्पष्ट केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here