उज्वला लाड आंबा प्रतिनिधी:-
मंगळवार दिनांक 13 फेब्रुवारी या दिवशी गणेश जयंती होती. राज्यभर विविध ठिकाणी या दिवशी गणपतीची पूजा व महाप्रसादाचे आयोजन केले जाते.
आंबा जवळील मानोली येथे विशालगड रोडवर असणाऱ्या गणेश मंदिरात दरवर्षी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. परंतु या महाप्रसाद सोहळ्याचे वेगळेपण म्हणजे हा महा प्रसाद हा स्थानिक लोकांच्याकडून आयोजित न करता कोल्हापूरच्या बिन खांबी गणेश रिक्षा मित्र मंडळ या मंडळाकडून आयोजित केला जातो.
गेली अनेक वर्ष कोल्हापूरच्या बिन खांबी गणेश मित्र मंडळाचे कार्यकर्ते मानोली येथील या मंदिरात गणेश पूजा व महाप्रसादाचे आयोजन करतात. यासाठी आठवडाभर अगोदर मंडळाचे कार्यकर्ते वास्तव्यास असतात.
सर्व प्रकारचे नीट नाटके संयोजन ते एवढ्या लांब असूनही करतात. परिसरातील जवळजवळ चार ते पाच गावातील भाविक दिवसभर महाप्रसादाचा लाभ घेत असतात.
बिन खांबी रिक्षा मित्र मंडळाची कार्यकर्ते अहो रात्र राबून महाप्रसादासाठी झटत असतात. सकाळी आरती गणेश पूजा अभिषेक झाल्यानंतर भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात आयोजन करून सुद्धा अतिशय शिस्तबद्धता स्वच्छता आणि स्वादिष्ट भोजन असे नीटनेटके नियोजन असते. कुठेही गोंधळ गोंगाट दिसत नाही. अतिशय भक्ती भावांनी हे कार्यकर्ते स्वतःला झोकून देतात. अशाप्रकारे हा कार्यक्रम संपन्न झाला.